कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी त्र्यंबकराव जिरापुरे, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, जिल्हा कार्यवाह प्रकाश शेळके उपस्थित होते. शिवाजी चौकापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. कार्यक्रमात कारसेवक राम किशोर श्रीवास, बाबूलाल गुप्ता, राजेंद्र गुल्हाने, वसंता केळकर, राजाभाऊ बढे यांचा सत्कार करण्यात आला. तालुका संयोजक मंगेश अंबाडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा प्रचारक अंबादास साठे, हभप वहिले महाराज, दत्ता कपिले, कमलाकर गावंडे, सचिन देशमुख, रीतेश सबाजकर, अशोक शर्मा, विनायक वारे, भारत भगत, रामा हजारे, अभय पांडे, राहुल गुल्हाने, शालिनी हजारे, तिवारी उपस्थित होते.
अयोध्येतील श्रीराम मंदिर बनेल भारताची नवी ओळख- तुकाराम महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST