शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम जन्माच्या सोहळ्यासाठी अकोला नगरी सज्ज; धार्मिक देखाव्यांची धुम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 17:43 IST

अकोला : प्रभु श्रीराम जन्माच्या सोहळ््यासाठी संपूर्ण अकोला नगरी सज्ज झाली असून शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी उभारलेले मनमोहक धार्मिक देखावे अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

ठळक मुद्देसंपूर्ण देशवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीराम जन्माचा उद्या रविवारी मोठ्या उत्साहात सोहळा पार पडणार आहे.शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर ते मोठे राम मंदिर परिसर ते सिटी कोतवाली, कापड बाजार, गांधी चौकासह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यंदा धार्मिक संदेश देणारे सुमारे ७० पेक्षा जास्त आकर्षक चित्ररथ,देखावे सादर केले जाणार आहेत.

अकोला : प्रभु श्रीराम जन्माच्या सोहळ््यासाठी संपूर्ण अकोला नगरी सज्ज झाली असून शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी उभारलेले मनमोहक धार्मिक देखावे अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.संपूर्ण देशवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीराम जन्माचा उद्या रविवारी मोठ्या उत्साहात सोहळा पार पडणार आहे. शहरातील मोठ्या राम मंदिरात श्रीराम नवमीनिमीत्त दर्शनासाठी अकोलेकर प्रचंड गर्दी करतात. मागील काही वर्षांपासून श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकारातून रामनवमीच्या निमीत्ताने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे. शोभायात्रा पाहण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी अकोलेकर दरवर्षी गर्दीचे उच्चांक मोडून काढत आहेत. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर ते मोठे राम मंदिर परिसर ते सिटी कोतवाली, कापड बाजार, गांधी चौकासह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी निमीत्त शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बाजारपेठ सजल्याचे दिसून येत आहे.सकाळी होणार महापुजाश्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा, समितीचे अध्यक्ष महादेवराव हुरपडे, अशोक गुप्ता, गिरीश जोशी ब्रिजमोहन चितलांगे आदींच्या उपस्थितीत मोठ्या राम मंदिरात रविवारी सकाळी ९.३० वाजता महापुजा केली जाणार आहे. भाजपासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत सायंकाळी ४ वाजता श्री राजराजेश्वर मंदिर येथून राजेश्वर महाराज व मोठ्या राम मंदिराच्या पालखीचे पुजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल.

आकर्षक चित्ररथ,देखाव्यांची धुमश्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने यंदा धार्मिक संदेश देणारे सुमारे ७० पेक्षा जास्त आकर्षक चित्ररथ,देखावे सादर केले जाणार आहेत. शोभायात्रेत मातृशक्तींच्या १०१ दिंड्या,भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. हैदराबादच्या धर्तीवर शहरात प्रथमच आकर्षक विद्युत रोषणाई उभारण्यात आली आहे. शोभायात्राच्या मार्गावर जात-पात-धर्म-पंथ विसरून अकोलेकर स्वागतासाठी कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. महाराणा प्रताप बागेसमोर श्रीकृष्णाची विराट प्रतिकृती व देखावा साकारण्यात आला आहे. गुजरात अंबुजा यांच्या सहकार्यातून ब्रिजलाल बियाणी चौकात रामदरबाराचा देखावा साकारण्यात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाRam Mandirराम मंदिरAkola cityअकोला शहर