शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मदिराच्या विकासकार्यासाठी निधी उपलब्ध करून देणार

By संतोष येलकर | Updated: January 9, 2024 17:14 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही : जिल्ह्यातील विकासकामांसाठी करणार तरतूद

अकोला : जिल्ह्यात महत्त्वाची आणि अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या आराखड्यात आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगत, अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासकार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठी वाढीव निधी देण्यासंदर्भात राज्यस्तरीय बैठकीत ‘व्हिडीओ काॅन्फरन्सिंग’व्दारे ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री आदी विभागप्रमुख सभागृहात उपस्थित होते.

जिल्ह्यातील आवश्यक विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही गतीने पूर्ण करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना वित्तमंत्र्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समितीच्या मागणीनुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले. त्यामध्ये अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासकार्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. त्यानुषंगाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन श्री राजराजेश्वर मदिराच्या विकासकार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून देशाच्या विकासप्रक्रियेला गती दिली आहे. जिल्ह्यातही केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

अंगणवाडी बांधकामासाठी निधी निश्चितीचा निर्णय घेणार अंगणवाडी इमारत बांधकाम खर्चासाठी सध्या ११ लाख रुपयांचा निधी देण्यात येत असून, हा निधी वाढवून देण्याची मागणी आ. रणधीर सावरकर यांनी बैठकीत केली. त्यानुषंगाने अंगणवाडी बांधकामासाठी निधी निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाAjit Pawarअजित पवार