शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

श्रीविष्णू तोष्णीवाल स्मृती टी-२0 क्रिकेट स्पर्धा; नागपूर व अमरावती संघ विजयी

By admin | Updated: January 14, 2015 00:12 IST

घरच्या मैदानावर अकोला संघ पराभूत; अक्षय व नयनची प्रेक्षणीय फलंदाजी.

अकोला : श्रीविष्णू तोष्णीवाल स्मृती टी-२0 क्रिकेट स्पर्धेतील तिसर्‍या दिवशी मंगळवारी नागपूरची प्रवीण हिंगणीकर क्रिकेट अकादमी व अमरावतीचे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संघांनी आपआपने सामने जिंकले. हे सामने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळण्यात आले. घरच्या मैदानावर अकोलाच्या दोन्ही संघांना मात्र पराभव पत्करावा लागला. सकाळच्या सत्रात नागपूरची हिंगणीकर क्रिकेट अकादमी व अकोला क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. नागपूर संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ६ बाद १४0 धावांचे लक्ष्य अकोला संघासमोर ठेवले. सलामीचा फलंदाज सर्वेश हिंगणीकर याने २५ धावा काढल्या. त्याला आकाश झा याने ९ धावांची साथ दिली. आकाश बाद झाल्यानंतर अक्षय कोल्हारे मैदानात उतरला. अक्षयने प्रेक्षणीय फलंदाजी करीत अर्धशतक झळकाविले. अक्षयच्या ५३ धावा संघाच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरल्या. अभिग्यान सिंहने २३ धावांचे योगदान दिले. अकोलाच्या आनंद हातोले, कुशल काकड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शारीक खान, मयूर बढे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.प्रत्युत्तरात अकोला संघाचे पहिले चार फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. शारीक खानच्या ४६ आणि सुमेध डोंगरेच्या २१ धावा याव्यतिरिक्त एकही फलंदाज नागपूरच्या वेगवान गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. अक्षय झा याने अकोल्याचे तीन गडी बाद केले. अभिग्यान सिंह व समीर देशमुख यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. अकोला संघ १९.४ षटकांत सर्वबाद ११९ धावा काढू शकला. दुपारच्या सत्रात अकोल्याची जिल्हा हौशी क्रिकेट संघटना व अमरावती संघात सामना खेळविण्यात आला. अकोला संघाने प्रथम फलंदाजी करीत १९.५ षटकांत सर्वबाद ११0 धावा काढल्या. भरवशाचा फलंदाज नयन चव्हाण याने आपल्या नावाला साजेशी खेळी करीत ६0 धावा काढल्या. पवन परनाटे याने २४ धावांचे योगदान दिले. अमरावती संघाकडून व्हीनस प्रताप व एन. एन. शुभनामन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. राहुल चिखलकर, स्वप्निल, सतीश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अमरावती संघाने प्रत्युत्तरात धडाकेबाज फलंदाजी करीत १७.१ षटकांत ५ बाद ११२ धावा काढून सामना जिंकला. संदीप मोरे ३७ व स्वप्निलच्या ३३ धावा राहिल्या. इम्रान, मोहित व रूपमने उत्तम गोलंदाजी केली.