शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचा विचार करावा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 16:04 IST

अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिला.

अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिला. त्याचवेळी सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी आंतरराष्ट्रीय परिणामांचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.शिवजयंती निमित्त भारीप-बमसंच्यावतीने अकोला येथे काढण्यात आलेल्या रॅलीला झेंडी देण्यासाठी आलेल्या अ‍ॅड. आंबेडकरांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर भाष्य करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की भारतासह अमेरिकेने आर्थिक नाड्या आवळल्यामुळे पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या स्थितीत येऊन पोहचला आहे. पाकिस्तानला या दिवाळखोरीतून सावरण्याची संधी मिळू नये, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला दिलेली २० मिलियन डॉलरची आर्थिक मदत रोखण्यासाठी भारताने प्रयत्न करावयास हवे होते. अमेरिकेने पाकची आर्थिक मदत रोखलीच आहे. इतर देशांनीही पाकला मदत करू नये यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.आर्थिक कोंडी करणे हा पाकविरोधातील सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगतानाच त्या देशाला जरब बसावी यासाठी सरकारने सर्जिकल स्ट्राईचाही विचार करावा. पुलवामा दहशतवादी हल्ला हा सिमेपलीकडून नव्हे तर भारताच्या भूमितच झालेला असल्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी भारताने त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, याचा सारासार विचारही करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आंबेडकर यांनी केले. पंतप्रधांनानी दहतवादी हल्ल्यासंदर्भातील माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसोबत ‘शेअर ’ केली पाहिजे, असे आपले मत असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकPakistanपाकिस्तान