शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी पैसे नसल्याने अल्पभूधारक शेतकरी पुत्राची आत्महत्या

By admin | Updated: April 23, 2016 02:27 IST

दुष्काळदाह: अकोला जिल्ह्यातील मन सुन्न करणारी घटना.

बबन इंगळे, सायखेड (जिल्हा अकोला) घरी अवघी एक एकर शेती.. अशातच गत तीन वर्षांपासून नापिकी.. संसाराचा गाडा ओढण्यासाठी पित्याची आधीच होत असलेली ओढाताण.. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी पैसा कुठून येईल. अशा नाना प्रश्नांच्या चिंतेतून इयत्ता नववीच्या एका शेतकरी पुत्राने स्वत:चे जीवन संपविले. दुष्काळाची दाहकता दर्शविणारी आणि मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील पुनोती गावात गुरुवारी घडली. आकाश मधुकर मंजुळकर हे मृत्यूला कवटाळलेल्या मुलाचे नाव आहे.अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सतत तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कर्ज काढून पिके घ्यायची, प्रसंगी संपूर्ण कुटुंब शेतात राबायचे; मात्र हंगामाच्या शेवटी मशागत व लागवडीचाही खर्चही निघणार नाही, एवढे पीक होत आहे. अशीच काहीशी परिस्थिती मधुकर मंजुळकर यांची आहे. त्यांच्याकडे अवघी एक एकर कोरडवाहू शेती. शेती असून नसल्यासारखीच असल्याने त्यांनी गवंडी काम पत्करले. परिस्थितीशी दोन हात करीत मोठी मुलगी अंजना हिचा विवाह केला. लहान मुलगी अनिता व एकुलता एक मुलगा आकाश यांना शिक्षित करावे, यासाठी त्यांनी कंबर कसली; मात्र त्यांचा मुलगा आकाशकडून कुटुंबातील सदस्यांची होत असलेली ओढाताण पाहवल्या गेली नाही. गुरुवार, १४ एप्रिल रोजी त्याने शेतातच विष प्राशन करून जीवनाला पूर्णविराम दिला. इवल्याशा आकाशचे असे जाणे, सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले. शिक्षणाचा ध्यासमंजुळकर कुटुंब हे वडार समाजाचे असून, पूर्वी या समाजात शिक्षणाचा अभाव होता. स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे राहू नयेत, आपल्या वाट्याला आलेल्या कष्टाचे चटके मुलांना बसू नये, यासाठी मधुकर मंजुळकर व त्यांची पत्नी मंगला यांनी मुलांना शिक्षित करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मिळेल ते काम पत्करले. अशा स्थितीत त्यांच्या मुलाच्या जाण्याने समाजमन सुन्न झाले आहे.कुटुंबावर शोककळालाडात वाढलेला आकाश हा मंजुळकर कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. समृद्धीचे, उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगण्यासारख्या, कोवळ्या वयातच आकाशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मंजुळकर कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळाला. या घटनेच्या वेळी आकाशचे वडील हे बाहेरगावी गवंडी काम करण्यासाठी गेले होते. ही वार्ता समजताच त्यांना प्रचंड धक्का बसला. कुटुंबाचा आक्रोश पाहून, संपूर्ण गाव हळहळले.