शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:47 IST

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘लॉकडाउन’मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांद्वारे निर्जंतुक पाणी पुरवठा करण्यासाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात कारंजा रमजानपूर, लोहारा, वझेगाव, खांबोरा ६० गावे व खांबोरा ४ गावे इत्यादी पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.या योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा करण्याचा आदेश संबंधित पुरवठादारास देण्यात आला; मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा अद्याप होऊ शकला नाही.त्यामुळे ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा निर्माण झाल्याने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अकोला विभागीय कार्यालयाकडून उसनवारीवर १५० बॅग ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत पाणी पुरवठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘ब्लिचिंग पावडर’ची गरज भागविली जात आहे.जिल्ह्यातील पाच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत पाणी पुरवठ्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा आदेश दिला होता; मात्र लॉकडाउनमुळे पुरवठादाराकडून ‘ब्लिचिंग पावडर’चा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे मजीप्राकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेण्यात आली आहे.-किशोर ढवळे, कार्यकारी अभियंता,जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद