शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीशिवाय पातूर बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:42 IST

खरीप पणन हंगाम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पातूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने एकही दाणा ज्वारी नसताना ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन सोमवारी दुपारी शासकीय गोदामात तहसीलदारांच्या हस्ते उरकून घेतले. 

ठळक मुद्देपावसामुळे तालुक्यात दज्रेदार ज्वारी उपलब्धच नाही!

शिर्ला: खरीप पणन हंगाम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पातूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने एकही दाणा ज्वारी नसताना ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन सोमवारी दुपारी शासकीय गोदामात तहसीलदारांच्या हस्ते उरकून घेतले.  पातूर तालुक्यात तीन हजार हेक्टरवर हायब्रीड ज्वारीची पेरणी केली होती; मात्र कापणी, सोंगणीच्या ऐनवेळी पाऊस झाला. पावसाने संपूर्ण हायब्रीड ज्वारी काळी पडली. काळ्या ज्वारीची खरेदी न करण्याच्या अघोषित निर्णयामुळे पेरणी, कापणी, सोंगणीवर केलेला शेतकर्‍यांचा संपूर्ण खर्च गेला आहे. शासनाने तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने सोमवारपासून पातुरात खरीप पणन हंगाम २0१७-१८ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी सुरू केली. हायब्रीड ज्वारी, बाजरी, मका या धान्याचे केवळ एफएक्यू दर्जाचे धान्य स्वीकारल्या जाणार आहे. त्यामुळे तीन हजार हेक्टरवरील काळी ज्वारी शेतकर्‍यांच्या घरात पडून राहणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने एफएक्यू प्रतीचे धान्य शेतकर्‍यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर/बाजार समिती स्तरावर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ७/१२,आधार कार्ड व बँकेच्या पासबुक झेराक्स घेऊन जावे लागणार आहे; मात्र अद्यापही पातूरच्या केंद्रावर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन नोंदणी सुविधा नाही. त्याबरोबरच आद्र्रता मोजणी यंत्र नाही. खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ वांझोटी अंमलबजावणी केली असल्याची चर्चा शेतकरी वर्गात केली जात आहे. ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांनी शासकीय गोदामात काटापूजन करून केले. यावेळी पुरवठा अधिकारी लोखंडे, खरेदी-विक्री संघ व्यवस्थापक अजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय भगत, गोदामपाल एन.एम. ढोके आदी उपस्थित होते. 

खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुविधा त्याबरोबरच आद्र्रता मापक यंत्रणा उपलब्ध करावी अशी सूचना केली. -डॉ.आर.जी. पुरी, तहसीलदार, पातूर 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार