शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीचे ब्रेक फेल, पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली!

By atul.jaiswal | Updated: December 19, 2024 18:09 IST

चालकाच्या प्रसंगावधानने टळला अनर्थ : अशोक वाटीका चौकातील थरार

अकोला : अमरातीकडून येणारी शिवशाही बस वेगाने अकोश वाटीका चौकात येते व थेट पेट्रोल पंपाच्या भींतीवर जाऊन धडकते. घटना पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडतो व घटनास्थळी एकच खळबळ उडते. ही थरारक घटना अकोला शहरातील अशोक वाटीका चौकात गुरुवारी (१९ डिसेंबर) दुपारी चार वाजताचे सुमारास घडली. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

अकोला क्र. २ आगाराची अमरावती-अकोला शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्न्ल्यू ४३१६) अमरावती येथून काही प्रवासी घेऊन अकोल्यात पोहोचली. बोरगाव मंजू व शिवणी येथे बसमधील प्रवासी उतरल्यानंतर रिकामी बस अकोला मध्यवर्ती बसस्थानकाकडे येत असताना नेहरु चौकात बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक मनोज तायडे यांच्या लक्षात आले. त्यांनी गिअरद्वारे वेगावर नियंत्रण मिळवत अशोक वाटीका चौकापर्यंत आणली. या ठिकाणी रेड सिग्नल असल्यामुळे अनेक वाहने थांबलेली असल्याचे पाहताच चालकाने प्रसंगावधान दाखवत आपली बस पेट्रोल पंपाच्या दिशेने घेत आवारभींतीवर धडकवली. त्यामुळे बस जागीच थांबली व पुढील अनर्थ टळला.

...तर अनेक जण चिरडले गेले असतेब्रेक निकामी झालेली शिवशाही बस नेहरु पार्क चौकातून अशोक वाटीका चौकात आली तेव्हा उड्डाणपुलाखालील सिग्नल लाल होता. वर्दळीच्या असलेल्या या चौकात अनेक वाहने सिग्नल हिरवा होण्याच्या प्रतीक्षेत थांबलेली होती. शिवशाही बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून बस पेट्रोल पंपाच्या भींतीवर धडकवली नसती तर ती सरळ चौकात जाऊन तेथे उभ्या असलेल्या वाहनचालकांना चिरडत पुढे गेली असती.

बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पॅडल ब्रेक आतमध्ये गेल्याचे दिसले. बस थांबविण्यासाठी मी गीअर कंट्रोल करत वेग कमी केला व पेट्रेाल पंपाच्या भींतीवर बस नेली. तसे केले नसते तर चौकात उभे असलेले अनेक जण चिरडले गेले असते.- मनोज तायडे, अपघातग्रस्त शिवशाही बसचालक

टॅग्स :AkolaअकोलाShivshahiशिवशाहीAccidentअपघात