शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

अयोध्येसाठी शिवसेनेचा बिगुल; २३ नोव्हेंबरला होणार रवाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:29 IST

अकोला : अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त करीत शिवसेनेने येत्या २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होण्याचा बिगुल फुंकला. ...

अकोला: अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त करीत शिवसेनेने येत्या २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येत दाखल होण्याचा बिगुल फुंकला. सेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत येत्या २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपावर शरसंधान साधत अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील असंख्य शिवसैनिक अयोध्येत दाखल होणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर शिवसेना जिल्हाप्र्रमुख नितीन देशमुख यांनी नियोजन करण्यासाठी रविवारी स्थानिक विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. पक्षप्रमुखांच्या आवाहनाला शिरसावंद्य मानत २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येसाठी रवाना होण्यावर शिवसैनिकांनी शिक्कामोर्तब केले. यावेळी सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी जिल्ह्याच्या कानाकोपºयातून शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शिवसैनिकांना प्रवासाकरिता रेल्वे, खासगी वाहन तसेच विमान प्रवासाबद्दल सविस्तर माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत २३ नोव्हेंबर रोजी अकोला येथून कूच करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकार, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, मुकेश मुरूमकार, दिलीप बोचे, शहर प्रमुख (पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष अनासने, तरुण बगेरे, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, तालुका प्रमुख विजय मोहोड, अप्पू तिडके, गजानन मानवतकर, संजय शेळके, रवी मूर्तडकर, विकास पागृत, योगेश गीते, योगेश अग्रवाल, नितीन ताथोड, संजय भांबेरे, एकनाथ दांदळे, रामचंद्र घावट, पप्पू चौधरी, गजानन मोरे, संतोष भगत, अजय ढोणे, मनीष मोहोड, आनंदा अढाऊ, गोपाळ म्हैसने, वहीद खान, अर्जुन गावंडे, दीपक इंगळे, गणेश कोरडे, प्रमोद पातोडे, महादेव भिसे जिल्हा महिला संघटक देवेश्री ठाकरे, रेखा राऊत, पं. स. सभापती गंगाताई अंभोरे, सरिता वाकोडे, राजेश्वरी शर्मा, नीलिमा तिजारे, वर्षा पिसोडे, रेखा तिवारी, हर्षा देवकर, संगीता मराठे, आशा गावंडे, सीमा मोकळकर, युवा सेनेचे कुणाल पिंजरकर, राहुल कराळे, योगेश बुंदेले, दीपक बोचरे, ऋषिकेश ताथोड, सचिन भाटे, राजेश पाटील, दिनेश ढगे, सौरभ नागोसे आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा!शिवसैनिकांना २३ नोव्हेंबर रोजी अयोध्येसाठी रवाना व्हावे लागणार आहे. अशावेळी प्रवास तसेच इतर विषयांवर सविस्तर माहिती हवी असल्यास शिवसैनिकांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाºयांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना