शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:35 IST

अकोला : ऐन नवरात्र उत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी करीत आक्रमक झालेले शिवसैनिक मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडकले. वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरणने हिंदू धर्मीयांच्या सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा शिवसेना शहर प्रमुख ( ...

अकोला: ऐन नवरात्र उत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी करीत आक्रमक झालेले शिवसैनिक मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडकले. वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरणने हिंदू धर्मीयांच्या सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा शिवसेना शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला.हिंदू धर्मीयांच्या सणासुदीची रेलचेल सुरू झाली आहे. सर्वाधिक पवित्र मानल्या जाणाºया नवरात्र उत्सवाच्या तोंडावर महावितरण कंपनीने जुने शहरात भारनियमनाचे हत्यार उपसले. यासंदर्भात जुने शहरवासीयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता भारनियमन करण्यात आले. शहरातील काही विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. त्याचा अधिभार इतर सर्वसामान्य अकोलेकरांना जमा करावा लागतो. या सर्व बाबींची माहिती असूनही वीज चोरीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महावितरण कंपनीने सणासुदीच्या काळातील भारनियमन बंद करण्याची मागणी करीत शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी महावितरण क ार्यालयावर धडक दिली. यावेळी अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, संघटक तरुण बगेरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, मा. नगरसेवक शरद तुरकर, विक्की ठाकूर, अविनाश वानखडे, प्रमोद मराठे, आकाश मुद्गल, विनोद मोरे, आरती वरडे, सोनल देशपांडे, योगिता सांचेला, करुणा चुटके, सीमा गावंडे, मनोज बाविस्कार, अक्षय कुळकर्णी, मुकेश तायडे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरण