शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना विदर्भात फुंकणार रणशिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:38 IST

अकोला: विदर्भातील लोकसभेच्या १० मतदारसंघांमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसेना रणशिंग फुंकणार असून, सभेच्या नियोजनासाठी  बुधवारी नागपूर येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

अकोला: विदर्भातील लोकसभेच्या १० मतदारसंघांमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसेना रणशिंग फुंकणार असून, सभेच्या नियोजनासाठी  बुधवारी नागपूर येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश शिवसेना भवन येथून जारी करण्यात आला आहे.कधीकाळी विदर्भात दरारा असणाºया शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भाजपाने पीछाडीवर टाकल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा स्पष्ट केल्यानंतर त्यांचा मोर्चा विदर्भाकडे वळल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील शेतकºयांच्या अडचणी, समस्या सोडविण्याच्या उद्देशातून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्व आणि पश्चिम विदर्भात गाव तेथे शाखा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मागील काही वर्षांत पूर्व-पश्चिम विदर्भात भाजपाने मजबूत पक्ष बांधणी केल्याचे चित्र आहे. उशिरा का होईना, ही बाब शिवसेनेच्या निदर्शनास आली असून, वर्षभराच्या कालावधीत पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार वेळा दाखल होऊन पक्ष संघटनेचा आढावा घेतला. शेतकºयांचा भाजपविरोधी सूर आणि पक्षासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील लोकसभेच्या दहा मतदारसंघांवर पकड निर्माण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यानुषंगाने १६ जानेवारी नागपूर येथील काटोल नाका परिसरातील जंक्शन-फंक्शन हॉलमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रमुख पदाधिकाºयांना उपस्थित राहण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे.या मतदारसंघांचा आहे समावेशनागपूर येथील बैठकीत नागपूर लोकसभा, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, यवतमाळ-वाशिम, अमरावती, अकोला व बुलडाणा लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाºयांचा समावेश राहणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल.-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना