लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिव नगर येथील रहिवासी युवक त्याच्या भावासोबत असताना त्याला दोन युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.शिव नगरातील पृथ्वीराज एललकर यांना राहुल रमेश खडसान व सागर कृष्णा पुर्णे या दोघांनी बेदम मारहाण केली. कोणतेही कारण नसताना या दोन गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी पृ थ्वीराज एललकर यांना बेदम मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिव नगरातील युवकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:06 IST
अकोला : शिव नगर येथील रहिवासी युवक त्याच्या भावासोबत असताना त्याला दोन युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
शिव नगरातील युवकास बेदम मारहाण
ठळक मुद्देदोन आरोपी अटकेतगुन्हे दाखल