शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी शिवभक्तांचा तेल्हारा तहसिल व नगरपालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:10 IST

सोमवारी तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे , भजनाच्या गजरात भर पावसात मोर्चा काढला.

तेल्हारा : तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळणी व पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाल्यामुळे शासन व प्रशासनाला जाग आणण्यासाठी कावडधारी शिवभक्तांसह नागरिकांनी सोमवारी तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे , भजनाच्या गजरात भर पावसात मोर्चा काढला. खड्डे बुजविण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवभक्तांनी दगडाला खड्ड्यातीला पाण्याचा जलाभिषेक करून निषेध केला.तसेच स्थानिक गौतमेश्वर मंदिर समोर पूल व रस्ता बाधण्याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. श्रावण महिन्यात तेल्हारा शहरासह तालुक्यातून तून मोठ्या प्रमाणात कावडधारी शिवभक्त तेल्हारा ते अंदुरा व तेल्हारा ते धारगडला जातात. परंतु, कावडमार्गाची खड्ड्यांमुळे पुरती वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाले असून, अनेक जन जखमी झाले. तर काहींना आपला प्राण सुद्धा गमवावा लागला आहे. येत्या काही दिवासातच कावड यात्रेला सुरुवात होणार असून कावड धारक भाविक भक्ताना पूर्णा नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. सदर रस्त्यांवरील खाड्यामुळे अपघात किंवा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . रात्रीच्या वेळेस या रस्त्यांवरून कावड धारकांना कावड घेऊन चालणे शक्य नाही . या रस्त्याकडे या विभागातील लोकप्रतिनिधी , व संबधित अधिकारी यांचे अनेक वषार्पासून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे .चाळणी झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी तसेच तेल्हारा येथील गौतमेश्वर मंदीरासमोरील गौतमा नदीवर पुलबांधून रस्ता करण्यात यावा या करिता तहसीलदार व मुख्याधिकारी न.प.तेल्हारा यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते , पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे , भरीप बहुजन महासंघचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे ,सुभाष रौदळे, कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाकोडे व डॉ. अशोक बिहाडे , एकता मंडळाच्या वतीने गजानन गायकवाड , लोकजागर मंच वतीने चंर्द्कांत मोरे , गौतेमेश्वर संस्थान तर्फे राहुल मिटकरी , युवाक्रांति विकास मंच अध्यक्ष रामा फाटकर, आदींनी मनोगत व्यक्त केले . आयोजित मोर्चा मध्ये स्थानिक कावड धारी शिव भक्त मंडळ , विविध मंडळे , सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पाधिकारी सह कार्यकर्ते व नागरिक शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते . ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शन खाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagitationआंदोलन