आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वबळावर चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:32 AM2020-10-31T11:32:46+5:302020-10-31T11:34:22+5:30

Shiv Sena, Akola Municipal corporation, Election स्वबळावरच लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.

Shiv Sena's test on its own for the upcoming elections in Akola District | आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वबळावर चाचपणी

आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वबळावर चाचपणी

Next

अकाेला:  आगामी महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेनेने आतापासूनच चाचपणी सुरू केली आहे. आगामी निवडणुका स्वबळावरच लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवनाच्या प्रांगणात झालेल्या या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, आ. गाेपीकिशन बाजाेरिया, गाेपाल दातकर, अतुल पवनीकर, राजेश मिश्रा आदी उपस्थित हाेते. शिवसेनेने शहर तालुका व विभाग प्रमुखाच्या या बैठकीत बाेलताना आ. देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या कामाची माहिती जतनेपर्यंत पाेहोचवा. आतापासून निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करून भगवा फडकवायचाच आहे, असा संकल्प करण्याचे आवाहन केले. आ. बाजाेरिया यांनीही शिवसेनेची ताकद वाढण्याच्या दृष्टीने प्रत्येक शिवसैनिकांनी बुथ लेव्हलपासून सजग राहावे, असे सांगितले.

Web Title: Shiv Sena's test on its own for the upcoming elections in Akola District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.