शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

मुख्यमंत्र्यांच्या ‘जनआशीर्वादा’ने शिवसेनेत अस्वस्थता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:58 IST

पाचपैकी किमान दोन मतदारसंघांची अपेक्षा ठेवून असलेल्या शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या ‘जनआशीर्वादा’ने अस्वस्थता पसरली आहे.

- राजेश शेगोकारअकोला: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अकोल्यातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा उल्लेख कटाक्षाने टाळला. भाजपची यात्रा असल्यामुळे साहजिकच भाजपचा उदो-उदो होणे अपेक्षित होते; मात्र भाषणाच्या ओघात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व भाजपा आमदारांच्या नावांचा उल्लेख करीत उपस्थित जनसमुदायाला त्यांच्या पाठीशी आशीर्वाद कायम ठेवण्याचे साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही कृती भाजपाच्या विद्यमान आमदारांना व त्यांच्या समर्थकांना उमेदवारीच जाहीर झाल्यासारखी वाटल्याने युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. अकोल्यात पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत भाजपाचे आमदार असून, उर्वरित एका मतदारसंघासाठी भाजपा, शिवसेना व शिवसंग्राम अशी स्पर्धा आहे. त्यामुळे पाचपैकी किमान दोन मतदारसंघांची अपेक्षा ठेवून असलेल्या शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या ‘जनआशीर्वादा’ने अस्वस्थता पसरली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती व आघाडी गृहीत धरून सध्या या दोन्ही पक्षांच्या घटक पक्षांमध्ये मतदारसंघ मिळविण्यासाठीच स्पर्धा सुरू झाली आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा अशा सर्वाधिक प्रबळ दावेदारीचा मतदारसंघ आहे. युतीमध्ये भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघावर शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावा आहे. २०१४ च्या निवडणुकीत अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघ जिंकणाऱ्या भाजपाला बाळापूर मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. खरेतर ही जागा युतीमध्ये शिवसंगामला देण्यात आली होती; मात्र जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे ही जागा ऐनवेळी भाजपाला देण्यात आली. त्यामुळे शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवत भाजपाच्या मतांना खिंडार पाडले. आता शिवसंग्राम पुन्हा तयारीला लागल्याचे खुद्द विनायक मेटे यांनी अकोल्यात येऊन ठामपणे सांगितल्याने शिवसेनेच्या दावेदारीला आणखी एक प्रबळ दावेदाराची स्पर्धा असल्याचे अधोरेखित झाले. आता बाळापूर कोणाच्या पारड्यात, हा गुंता यावेळीही चांगलाच चर्चेत राहणार आहे. दुसरीकडे शिवसेनेला जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ हवा आहे. अकोट, मूर्तिजापूर व किमान अकोला पूर्व तरी मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. या तिन्ही मतदारसंघांत भाजपाचे आमदार असल्याने विद्यमान आमदारांची उमेदवारी कापणार का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. मूर्तिजापूर, अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघापेक्षाही अकोट या मतदारसंघात शिवसेनेने आपला दावा अधिक प्रबळ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.एकतर हा मतदारसंघ भाजपाने २०१४ मध्ये पहिल्यांदाच जिंकला. यापूर्वी युतीमध्ये या मतदारसंघातून सेनेचा भगवा फडकला होता. त्यामुळे सेनेचा पहिला दावा ‘परंपरा’ या निकषावर सुरू झाला. त्यातच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे ‘बाहेरचे’ उमेदवार या आणखी एका मुद्याची भर पडली व आता त्यांच्यावर शिवसेनेकडूनच निष्क्रियतेचा शिक्का मारला जात असून, त्या करिता तेल्हाºयातून अकोल्यात पळविलेल्या भारत बटालियनचा ताजा आधार जोडल्या जात आहे. या पृष्ठभूमीवर येणाºया काळात शिवसेना व भाजपा युतीच्या जागा वाटपामध्ये अकोट व बाळापूर हे दोन मतदारसंघ सर्वाधिक तणावाचे राहतील, हे स्पष्टच होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी सर्व आमदारांसाठी आशीर्वाद मागितले असले तरी ती औपचारिकता होती, असा सूर ही भाजपाकडून सावध रीतीने व्यक्त होत असला तरी या सुराला स्वबळाचा ‘कोरस’ सामान्य कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळेच सध्या शिवसेनेत अस्वस्थता आहे व ती अस्वस्थताच अकोटात सेनेने घेतलेल्या बैठकीत अधोरेखित झाली हे नाकारता येत नाही. अकोटात भाजपामध्ये ‘स्थानिक’ उमेदवाराची मागणीएकीकडे शिवसेना अकोट मतदारसंघावर दावा करीत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी स्पष्ट मागणी ९ आॅगस्ट रोजी अकोटाच झालेल्या भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आल्याने युतीमध्ये मतभेदच नव्हे तर मनभेदाचेही बीजारोपण झाल्याचे स्पष्ट होते. अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीत भाजपाच्याच लोकप्रतिनिधीवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे राहिला तरी भाजपातील मतभेद मिटविण्याचे आव्हान पक्षासमोर राहील.एकतर हा मतदारसंघ भाजपाने २०१४ मध्ये पहिल्यांदाच जिंकला. यापूर्वी युतीमध्ये या मतदारसंघातून सेनेचा भगवा फडकला होता. त्यामुळे सेनेचा पहिला दावा ‘परंपरा’ या निकषावर सुरू झाला. त्यातच विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे ‘बाहेरचे’ उमेदवार या आणखी एका मुद्याची भर पडली व आता त्यांच्यावर शिवसेनेकडूनच निष्क्रियतेचा शिक्का मारला जात असून, त्या करिता तेल्हाºयातून अकोल्यात पळविलेल्या भारत बटालियनचा ताजा आधार जोडल्या जात आहे. या पृष्ठभूमीवर येणाºया काळात शिवसेना व भाजपा युतीच्या जागा वाटपामध्ये अकोट व बाळापूर हे दोन मतदारसंघ सर्वाधिक तणावाचे राहतील, हे स्पष्टच होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जरी सर्व आमदारांसाठी आशीर्वाद मागितले असले तरी ती औपचारिकता होती, असा सूर ही भाजपाकडून सावध रीतीने व्यक्त होत असला तरी या सुराला स्वबळाचा ‘कोरस’ सामान्य कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळेच सध्या शिवसेनेत अस्वस्थता आहे व ती अस्वस्थताच अकोटात सेनेने घेतलेल्या बैठकीत अधोरेखित झाली हे नाकारता येत नाही.

अकोटात भाजपामध्ये ‘स्थानिक’ उमेदवाराची मागणीएकीकडे शिवसेना अकोट मतदारसंघावर दावा करीत असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी स्पष्ट मागणी ९ आॅगस्ट रोजी अकोटाच झालेल्या भाजप पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आल्याने युतीमध्ये मतभेदच नव्हे तर मनभेदाचेही बीजारोपण झाल्याचे स्पष्ट होते. अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीत भाजपाच्याच लोकप्रतिनिधीवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे राहिला तरी भाजपातील मतभेद मिटविण्याचे आव्हान पक्षासमोर राहील.

 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राShiv Senaशिवसेना