शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शिवसेनेला नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:39 IST

या मतदारसंघात प्रथमच खाते उघडल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव बाळापूर मतदारसंघ आल्यामुळे पक्षात चांगलीच धुसफूस निर्माण झाली होती. पक्षांतर्गत विरोधकांवर कुरघोडी करीत बाळापूर मतदारसंघातून दंड थोपटणारे शिवसेनेचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना तरुणांची मिळालेली साथ आणि बुथ प्रमुखांच्या ‘मॅनेजमेंट’ने विजयश्री मिळवून दिल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात प्रथमच खाते उघडल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलल्या जात आहे.सप्टेंबर २०१६ मध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेताच जिल्हा कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले होते.माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे ‘प्रमोशन’ करीत त्यांच्याकडे सहायक संपर्क प्रमुख पदाची धुरा सोपवून जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी नितीन देशमुख यांच्याकडे सोपविली. उण्यापुऱ्या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्हाप्रमुख देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करण्यासोबतच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील तटबंदी मजबूत करण्याकडे लक्ष दिले. २००९ मध्ये अकोट मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय गावंडे विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येणार आणि उमेदवाराचा विजय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्नमहायुतीच्या जागा वाटपात जिल्ह्यातून एकमेव बाळापूर मतदारसंघ निश्चित होणार असल्याचे दिसताच पक्षातील काही इच्छुकांनी जिल्हाप्रमुखांसह पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अकोट मतदारसंघासाठी ‘फिल्डिंग’ लावणाºया इच्छुकांनी पक्षांतर्गत विरोधकांना छुप्या पद्धतीने खतपाणी घातल्याचा परिणाम दिसून आला. पक्षाने ग्रामीण भागातील कोणताही एक आणि शहरी भागातील अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम मतदारसंघाची मागणी करावी, असा रेटा इच्छुकांनी लावून धरीत बंडाचे निशाण फडकावले होते.विरोधकांना चारी मुंड्या चीत२०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी अवघ्या तीन मतांनी देशमुख यांचा पराभव झाला. यामध्ये शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश होता. तेव्हापासूनच पक्षांतर्गत विरोधकांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू झाले. पक्षापासून फारकत घेणारे तसेच स्वपक्षीयांसह भाजपमधील कट्टर विरोधकांचा सामना करीत नितीन देशमुख निवडणुकीला सामोरे गेले. निकालाअंती या सर्वांना चारी मुंड्या चीत केल्याचे समोर आले.

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाbalapur-acबाळापूर