शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे मनपा अधिकाऱ्यांवर दबावतंत्र; धाकापोटी अधिकारी भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:05 IST

मंगळवारी महापालिकेत घडलेल्या प्रकारालाही भाजप-सेनेतील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजुरीसाठी विलंब होत असल्याची सबब पुढे करीत मंगळवारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह काही पदाधिकारी व नगरसेवकांनी महापालिकेत दाखल होत नगररचना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची शोधमोहीम राबविली. ही माहिती मिळताच घाबरलेले अधिकारी मनपातून भूमिगत झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे मनपाच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.महापालिकेचा नगररचना विभाग मागील काही दिवसांपासून प्रकाशझोतात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना नकाशा मंजुरीसाठी मनपात हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दर बुधवारी नगररचना विभागाच्या माध्यमातून प्रलंबित नकाशांना विनाविलंब मंजुरी देण्याचे धोरण आखले. हा प्रयोग सुरू असतानाच कालांतराने घरांचे नकाशे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आणि उच्चभू्र नागरिक, खासगी शिकवणी संचालक तसेच बड्या बिल्डरांच्या नकाशांना मंजुरी देण्यात येऊ लागली. यादरम्यान, शहरातील गुंठेवारी प्रकरणांना नियमबाह्यरीत्या मंजुरी दिली जात असल्याप्रकरणी थेट राज्य शासनाने सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुषंगाने मनपाचा नगररचना विभाग कामाला लागल्याची माहिती आहे. एकूणच, शहरातील अवैध बांधकामे, नियमबाह्यरीत्या मंजूर करण्यात आलेले गुंठेवारीचे नकाशे, ले-आउटमधील खुल्या जागा हडपण्याच्या प्रकरणात भविष्यात मोठे वादंग निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. यामागे सत्ताधारी भाजप व शिवसेनेतील काही नेत्यांच्या अंतर्गत कलहाची किनार असल्याचे बोलल्या जात आहे. मंगळवारी महापालिकेत घडलेल्या प्रकारालाही भाजप-सेनेतील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आगामी दिवसांत मनपा आयुक्त संजय कापडणीस या परिस्थितीला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

निर्णय घेऊन सोक्षमोक्ष लावा!नगररचना विभाग ले-आउट, नकाशा मंजूर करताना किंवा बांधकामाच्या विविध परवांगी देताना अकोलेकरांना झुलवत ठेवत असल्याचा आरोप होतो. असाच काहीसा प्रकार शिवसेनेचे काही नेते व पदाधिकाºयांच्या बाबतीत ले-आउट व नकाशा मंजुरीबाबत होत असल्याने संतप्त झालेले पदाधिकारी, सेनेचे नगरसेवक व काही नगरसेविका पतींनी मनपात धाव घेऊन नगररचना विभागातील काही अधिकाºयांची शोधमोहीम राबविली. मनपाने प्रलंबित प्रकरणांचा सोक्षमोक्ष न लावल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संबंधित सेना पदाधिकाºयांनी दिल्याची माहिती आहे.महापौरांच्या दालनात मॅरेथॉन बैठक

मंगळवारी मनपातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळातील वातावरण पूर्णत: ढवळून निघाल्याचे चित्र होते. दुपारी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात आमदार रणधीर सावरकर, आयुक्त संजय कापडणीस यांची बैठक सुरू होती. यादरम्यान शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया मनपात दाखल झाले. संबंधितांमध्ये सुमारे तीन ते चार तास चर्चा झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाShiv Senaशिवसेना