शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंंत शिवसेना जिल्हाप्रमुख कायम!

By admin | Updated: July 10, 2015 01:26 IST

अकोला जिल्हा कार्यकारिणीतील बदलासाठी निवडणुकीनंतरचा मुहूर्त.

अकोला- शिवसेनेच्या अकोला जिल्हाप्रमुख पदासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भातील शिवसेनेचे पदाधिकारी गत काही आठवड्यापासून बदलण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्याच्या शेजारी जिल्ह्याच्या नवीन जिल्हाप्रमुखांची घोषणाही करण्यात आली आहे. अगदी वाशिम जिल्हाप्रमुखांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या नेत्यांच्या उत्सुकतेवर बुधवारी पाणी फेरल्या गेले. मातोश्रीवरून जिल्ह्यातील नेत्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अकोला जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बदलाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्षअखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार अकोल्यातूनच दिला जात असल्याने जिल्हाप्रमुखांच्या बदलाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन नवीन जिल्हाप्रमुखाच्या नियुक्तीसाठी निवडणुकीनंतरचा मुहूर्त शोधला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.