शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gagnrape : शिवसेनेने जाळला योगी आदित्यनाथ यांचा पुतळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 20:06 IST

Hathras Gagnrape : शिवसेनेने शनिवारी जय हिंद चौक येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला

अकोला: उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील पीडित युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जय हिंद चौक येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याच्या मुद्यावरून जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार व सेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले.उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील युवतीवर अमानुष अत्याचार करून तिला शेतामध्ये फेकून देण्यात आले. घटनेच्या काही दिवसांनंतर उपचारादरम्यान पीडित युवतीचा रुग्णालयात मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी पीडित युवतीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन न करता परस्पर अंत्यविधी उरकून टाकला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी पीडित युवतीला गंभीररीत्या जखमी केल्याची माहिती आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी शिवसेनेचे शहर प्रमुख (पश्चिम अकोला)राजेश मिश्रा यांनी जय हिंद चौकात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख, विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. लोकप्रतिनिधी-पोलिसांमध्ये बाचाबाचीजय हिंद चौकात पुतळा जाळल्यानंतर शिवसेनेचे लोकप्रतिनिधी वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना माहिती देत होते. यावेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याची सबब पुढे करीत जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी लोकप्रतिनिधींना अटकाव केला. लोकप्रतिनिधींशी बोलताना ठाणेदार पवार यांचा पारा चढल्याने उपस्थित शिवसैनिकांनी पोलिसांच्या वर्तणुकीचा निषेध व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार