शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना-भाजप समान

By admin | Updated: February 4, 2017 02:23 IST

दोन्ही पक्षांचे ७३-७३ उमेदवार आमने-सामने

अकोला, दि. 0४- आजपर्यंंंत एकमेकांच्या मदतीने निवडणुकीला सामोरे जाणार्‍या शिवसेना, भाजपची महापालिकेसाठी युती तुटताच राजकीय समीकरणांमध्ये घडामोडी सुरू झाल्या. केंद्र व राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप मोठय़ा भूमिकेत वावरू लागला. अशा स्थितीत महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेने ७३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर योगायोगाने भाजपनेदेखील ७३ जागांवर उमेदवार उभे केले. त्यामुळे मनपाच्या निवडणुकीत नेमक ा कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे सर्वांंंचेच लक्ष लागले आहे. राज्यात पार पडलेल्या २0१४ मधील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचे बिनसले, ते अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्ष सत्तेची फळं चाखत असतानाच शिवसेनेकडून मित्र पक्षावर शाब्दिक हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली जात नाही. भाजपकडूनदेखील सेनेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमधील ही खदखद नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत समोर आली.निवडणूक रिंगणातील इच्छुक उमेदवारांना ह्यएबी फॉर्मह्णचे वाटप झाल्यानंतर युतीच्या निर्णयावर चर्चा झडू लागल्या. शेवटी नगरपालिका निवडणुकीत युती न करताच दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे पसंत केले. ही परिस्थिती राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत कायम राहील का,असा कयास बांधला जात असतानाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर करून यापुढे राज्यातील राजकारणाची दिशा बदलणार असल्याचे संकेत दिले. युती तुटल्याचा सर्वाधिक आनंद दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंनाच अधिक झाल्याचे दिसून आले. निवडणुकीतून उमेदवारीचा पत्ता कट होईल, या धास्तीने युती तुटल्याचे समाधान व्यक्त होऊ लागले. त्या दिशेने दोन्ही पक्षांनी वाटचाल सुरू केली. मनपाच्या ८0 जागांसाठी सेना-भाजपने प्रत्येकी ७३-७३ उमेदवारांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केले आहे. यापैकी दोन्ही पक्ष किती जागांवर विजयी होतात, हे मतदार राजावर अवलंबून आहे, हे तेवढेच खरे. आक्रमक होण्याचे निर्देशमहापालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आक्रमक बाणा जोपासण्याचा कानमंत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही पक्ष पहिल्यांदाच स्वबळावर लढत असल्यामुळे पक्षाची ताकद सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असण्याच्या मुद्यावर सेनेत रणनिती आखल्या जात आहे.