शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्रामची पश्चिम वऱ्हाडात चाचपणी; मेटे घेणार आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:08 IST

महायुतीमधील घटक पक्षही आपआपल्या तयारीत असून, शिवसंग्रामने पश्चिम वºहाडातील विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे

- राजेश शेगोकार

अकोला: लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी मिशन २२० प्लस हाती घेतले आहे. हे मिशन साध्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनादेश यात्राही सुरू केली असून, मित्रपक्षांना सोबत ठेवणार, अशी ग्वाही वेळोवेळी दिली आहे; मात्र राजकारणात ‘काहीही’ होऊ शकते, या उक्तीवर सर्वांचाच विश्वास असल्याने महायुतीमधील घटक पक्षही आपआपल्या तयारीत असून, शिवसंग्रामने पश्चिम वºहाडातील विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये अकोल्यातील बाळापूर व वाशिममधील रिसोड या मतदारसंघावर शिवसंग्रामचा दावा असला तरी सर्वच मतदारसंघात उमेदवारांच्या ताकदीचा धांडोळा घेण्यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे २ आॅगस्टपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामला गेल्या विधानसभेत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीड मध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले व बाळापुरात ऐनवेळी शिवसंग्रामऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. दुसरीकडे मेटे यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवित पूर्ण चार वर्ष झुलवित ठेवले व नंतर शिवस्मारकाची जबाबदारी देत बोळवण केली. या पृष्ठभूमीवर शिवसंग्रामने आता पासूनच सावध पवित्रा घेतला आहे. विनायक मेटे हे राज्याच्या दौºयावर निघाले असून, त्या निमित्ताने युतीमधील प्रमुख पक्ष भाजपा, सेनेवर दबाव टाकण्याची रणनीती आखली आहे. पश्चिम वºहाडातील बाळापूर व रिसोड या दोन मतदारसंघावर त्यांचे विशेष लक्ष असल्याने ते शुक्रवारी व शनिवार असे दोन दिवस अकोला, वाशिमसाठी देत आहेत. अकोल्यातील बाळापूर हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसंग्रामला मिळाला असतानाही स्थानिक नेतृत्वाच्या आग्रहापोटी या मतदारसंघात युतीमध्ये लढत देता आली नव्हती त्यामुळे यावेळी आतापासूनच या मतदासंघावर दावा करण्याची तयारी शिवसंग्रामने सुरू केली आहे. या मतदारसंघात शिवसेनाही कामाल लागली असून, त्यांनीही मतदारसंघावर दावेदारी केली आहे. भाजपा-सेना युतीमध्ये सेनेच्या वाट्याला सहज सोडता येईल असा बाळापूर हा एकच मतदारसंघ भाजपाकडे आहे. त्यामुळे सेना व शिवसंग्राम यापैकी कोणाला संधी द्यायची, असा गुंता भाजपा श्रेष्ठींपुढे होणार आहे. दुसरीकडे रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक यांच्या प्राबल्याला खिंडार पाडण्यामध्ये भाजपाला सतात्याने अपयशच आले आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. २०१४ मध्ये सर्वत्र मोदी लाट असतानाही येथे काँग्रेसने विजय मिळवित झनक कुटुंबाचे वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे या मतदारसंघात मजबूत असलेला काँग्रेस पक्षाला खिंडार पाडण्यासाठी व नेहमीच अपयश आलेल्या भाजपाऐवजी मित्रपक्षाला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मिळावा यासाठी शिवसेनेसह शिवसंग्राम या दोन्ही मित्रपक्षांनी मतदारसंघासाठी वरिष्ठांकडे साकडे घातले आहे.बाळापूर व रिसोड हे दोन्ही मतदारसंघ शिवसंग्रामला सहज मिळतील, अशी स्थिती नाही. मुळातच या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे इच्छुक उमेदवार हे प्रबळ दावेदार आहेतच, त्यामुळे शिवसेना व शिवसंग्राम या दोन्ही मित्रपक्षांची समजूत काढतातच भाजपासमोर निष्ठावंत इच्छुकांच्याही राजी-नाराजीचा प्रश्न उभा ठाकणार आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाVinayak Meteविनायक मेटे