शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती सप्ताहांतर्गत वेशभूषा अन् चित्रकला स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:00 IST

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

अकोला : शिवजयंती सप्ताहांतर्गत रविवारी वेशभूषा, चित्रकला स्पर्धेसह विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आले. वेशभूषा स्पर्धेनंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी पार्क येथून जय शिवराय जय जिजाऊ ,असा जयघोष करीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी शिवजयंती सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शिवजयंतीच्या या सोहळ्याची माहिती अकोलेकरांपर्यंत पोहोचावी, यासाठी रविवारी छत्रपती शिवाजी पार्क येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली रेल्वे स्टेशन चौक मार्गे अग्रसेन चौक, दुर्गा चौक, सिव्हिल लाइन मार्गे सहकार नगर येथील शिवस्मारक येथे पोहोचली. या ठिकाणी शिवस्मारकाला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शिवराय व जिजाऊंची वेशभूषा धारण केलेले स्पर्धक तसेच दोन शिव प्रचार रथ लक्षवेधी ठरले.वेशभूषा स्पर्धावेशभूषा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून प्रथम येणाऱ्याला शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारण्याचा मान मिळणार आहे. स्पर्धेला परीक्षक म्हणून पूनम पारसकर व शरद कोकाटे उपस्थित होते.शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासूनसार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सोमवार, १७ फेब्रुवारीपासून अकोट रोडस्थित छत्रपती शिवाजी पार्क येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. प्रदर्शनास अमळनेर येथील स्पार्क फाउंडेशनचे शस्त्र संग्राहक व इतिहास अभ्यासक पंकज दुसाने यांच्या संग्रहातील जवळपास ३०० शस्त्र प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.आरोग्य शिबिर व चित्रकला स्पर्धा

  • महाआरोग्य तपासणी शिबिरात १०० मूकबधिर रुग्णांची तपासणी.
  • जिल्ह्यातील १०० मूकबधिर समूहाला पालकमंत्री आ. बच्चू कडू संकल्पनेतून व सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे एक वर्षासाठी घेतले दत्तक.
  • सहकार नगर येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.
  • विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा पार पडली.

 

टॅग्स :Akolaअकोला