शिर्ला (पातूर, जि. अकोला ): शिर्ला गाव माहेर असलेल्या एका विवाहित महिलेचा २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. ही विवाहिता मागील आठवडाभरापासून नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होती. येथील माहेर असलेली शारदा महादेव इंगळे ही ३२ वर्षीय विवाहित महिला नागपूरच्या कामठी रोड येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात पतीसह वास्तव्यास होती. तिचे पती महादेव इंगळे हे तेथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. शारदा इंगळे हिला सूरज व आकाश नावाची दोन मुले असून, ती अनुक्रमे चौथ्या व दुसर्या वर्गात शिक्षण घेत आहेत. शारदा ही स्वाइन फ्लूने आजारी पडल्यामुळे तिला आठवडाभरापूर्वी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ५ वाजता तिचा मृत्यू झाला. शारदा ही शिर्ला येथील शहीद सैनिक कैलास काशीराम निमकंडे व सैन्यदलात कार्यरत असलेले विलास काशीराम निमकंडे यांच्या भगिनी होत्या. त्यांच्या पार्थिवावर बुलडाणा जिल्ह्यातील धानोरी येथे त्यांच्या सासरी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिर्लाच्या माहेरवाशीणचा नागपुरात स्वाइन फ्लूने मृत्यू
By admin | Updated: February 27, 2015 01:44 IST