शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
3
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
4
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
5
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
6
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
7
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
8
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
9
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
10
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
11
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
12
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
13
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
14
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
15
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
16
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
18
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
19
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

तडजोड, फोडाफोडी, मनधरणीचे राजकारण शिगेला

By admin | Updated: September 10, 2014 02:14 IST

महापौरांची आज निवडणूक, राजकीय पक्षांच्या बैठका

अकोला : महापौर पदाच्या निवडणुकीत बहुमताचे गणित जुळवून आणण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांना ऊत आला आहे. अपक्षांची मनधरणी, तडजोड व फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहचले आहे. सत्ताधारी काँग्रेस आघाडीसह विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेकडे अपवाद एक अपक्ष नगरसेवक वगळता समान संख्याबळ असल्याने बुधवारी सभागृहात कोण बाजी मारणार हे प्रत्यक्ष सभागृहातच ठरेल. महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपने बाह्या वर खोचल्या आहेत. काँग्रेसप्रणीत आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व अपक्ष नगरसेवकांचा समावेश असून, आघाडीचे संख्याबळ ३७ वर आहे. भाजप्रणीत महानगर सुधार समितीमध्ये अनेक अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. नगरसेवकांची समान संख्या भाजप-शिवसेनेकडे असून, अपक्ष नगरसेवक गोपी ठाकरे तटस्थ आहेत. अडीच वर्षांंच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, काँग्रेस आघाडी व विरोधी पक्षातील सुमारे दहा अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येऊन मोट बांधल्याचे चित्र आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या इच्छुकांमध्ये आपसात घमासान रंगण्यासोबतच अपक्ष नगरसेवकांच्या आर्थिक हिशेबावर राजकीय पक्षांमध्ये प्रचंड माथापच्ची सुरू आहे. ** निर्णय अधांतरीच; सकाळी पुन्हा बैठककाँग्रेसच्यावतीने पक्ष निरीक्षक जिया पटेल यांनी मंगळवारी रात्री सर्व १८ नगरसेवकांसोबत बैठकीत सविस्तर चर्चा केली. यामध्ये पाच इच्छुक नगरसेविकांपैकी कोणतेही एक नाव निश्‍चित होण्याची अपेक्षा होती. तसे न झाल्याने पाचही इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष १0 सप्टेंबर रोजी सकाळी अंतिम निर्णय घेतील. भाजप-शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली असता, बुधवारी सकाळी सात वाजता पुन्हा गटनेत्यांसोबत अंतिम चर्चा केली जाणार आहे. भारिपचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर बुधवारी सकाळी पक्षाची रणनीती स्पष्ट करणार आहेत. ** अपक्ष नगरसेवकांचे तळ्य़ात मळ्य़ातसत्ता स्थापन करतेवेळी धर्मनिरपेक्ष पक्षाला पसंती देत अनेक अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीत प्रवेश घेतला, तर काँग्रेस विरोधी अपक्ष नगरसेवक भाजपप्रणित महानगर सुधार समितीत दाखल झाले. अडीच वर्षांंच्या कालावधीत सत्तापक्षावर प्रचंड तोंडसुख घेणारे तसेच वेळप्रसंगी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल क रणार्‍या विरोधी पक्षातील अपक्ष नगरसेवकांचा महापौरपदाच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न टीकेचा विषय ठरत आहे.** दर घसरले; १0 ते १२ लाखांवर माथापच्चीकाँग्रेस आघाडीसह विरोधी पक्षातील अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत मोट बांधली. महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आर्थिक बोलणी अंतिम टप्प्यात असून, तशी बैठक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सत्तापक्षातील एका राजकीय पदाधिकार्‍यासोबत पार पडली. यामध्ये ५0 लाखांचे दर घसरून थेट १0 ते १२ लाखांवर येऊन ठेपले.