शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेवग्याची एक्सपोर्ट बाजारपेठ धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:52 IST

अकोला :  राज्यातील शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन चार पटीने  वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ धोक्यात आली आहे.  मागील वर्षांंच्या तुलनेत यंदा एक्सपोर्ट उठाव मिळाला  नसल्याने शेतकर्‍यांना राज्यातच शेवग्याच्या शेंगा विकण्याची  वेळ येत आहे.

ठळक मुद्देराज्यात चार पटीने उत्पादन वाढले प्रक्रिया उद्योगाची गरज

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  राज्यातील शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन चार पटीने  वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ धोक्यात आली आहे.  मागील वर्षांंच्या तुलनेत यंदा एक्सपोर्ट उठाव मिळाला  नसल्याने शेतकर्‍यांना राज्यातच शेवग्याच्या शेंगा विकण्याची  वेळ येत आहे. सर्वांत जास्त कॅल्शियमचे प्रमाण असलेल्या शेवग्याला आं तरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर वाव असल्याने दोन वर्षांंपासून  राज्यातून मोठय़ा प्रमाणात शेवग्याचे एक्सपोर्ट होत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेवग्याला भाव मिळत असल्याने  शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात शेवग्याचे उत्पादन घेतले. मात्र,  आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी निश्‍चित असल्याने आता  या मालास उठाव नाही. त्यामुळे पाच रुपये किलोच्या  भावानेदेखील ग्राहक राज्यात मिळेनासा झाला आहे. गुडघे  दुखी, मणके दुखी, सांधे दुखी यासाठी शेवग्याच्या शेंगाची  भाजी ही रामबाण उपाय आहे. मात्र, जिथे पिकते तिथे  विकल्या जात नाही. पाच रुपये किलोने शेवग्याच्या शेंगा  मिळत असल्या, तरी नाक मुरडल्या जात आहे. या शेंगांना  भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी शेवग्यावर प्रक्रिया  करणारा उद्योग टाकावा, त्याच्याशी संबंधित जोडधंदे करावे त. यासाठी शेवग्याचे सूप, सरबत करून बाजारात आणावे. शेवग्याची चटणी, पराठे, पापड तयार करावे, असेही  जाणकारांचे मत आहे. शेवग्याचे महत्त्व विदेशींना कळले.  जेव्हा त्याचे महत्त्व भारतीयांना कळेल, तेव्हा इस्राईलहून  आपण १५0 ते २00 रुपये किलोच्या भावाने शेवग्याच्या  शेंगा घेतल्याशिवाय राहणार नाही.

प्रवाळ व जनावरांच्या हाडांपेक्षा बरेहाडांची ढिसूळता, दातांचे विकार यासाठी वैद्यकीय मंडळी  कॅल्शियमच्या औषधी लिहून देतात. या औषधांमध्ये समुद्रा तील प्रवाळ आणि जनावरांच्या हाडांचा समावेश असतो.  त्यापेक्षा रुग्णांनी शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास उच्च प्र तीचे थेट कॅल्शियम मिळू शकते. शेवग्याच्या शेंगामध्ये  गांजराच्या १0 पट व्हिटॅमिन, दुधाच्या १७ पट कॅल्शियम  मिळते. सोबतच केळीच्या १५ पट पोटॅशियम मिळते,  पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटिन मिळते.-संदीप वाघाळकर, आहार तज्ज्ञ, अकोला.

मागील वर्षी शेवग्याला चांगला भाव मिळाल्याने, शेवग्याचे  पीक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची तयारी मी यंदा  केली होती. एक्सपोर्टला वाव नसल्याने हा माल अकोल्या तच विक्री करीत आहे. मात्र, त्याला फारशी किंमत  मिळालेली नाही. शेवग्याचे महत्त्व अद्याप नागरिकांना  कळलेले नाही.- नीलेश डहेनकार, शेतकरी अकोला.-