शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेख वसीम हत्या प्रकरण : 'बादल' ऐवजी 'वसीम'चा झाला गेम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:31 IST

बादलची हत्या करण्यासाठी केवळ वसीमचा वापर करण्याचे ठरले होते; मात्र यासाठी वसीमने नकार दिला.

ठळक मुद्देशेख वसीम शेख कलीम याची ४ मे च्या मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. १० तासातच छडा लावून आरोपी शेख रफिक शेख लतीफ (३२) याला अटक केली. न्यायालयाने त्याला ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मूर्तिजापूर : २६ वर्षीय ट्रकचालकाच्या हत्येचा मूर्तिजापूर शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० तासातच छडा लावून आरोपी शेख रफिक शेख लतीफ (३२) याला अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.येथील देवरण रोड मोहम्मदिया प्लॉट परिसरातील शेतशिवारात खडकपुरा भागात राहणाऱ्या शेख वसीम शेख कलीम याची ४ मे च्या मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली. 'वसीम'हा घटनेच्या दिवशी रासायनिक खताने भरलेल्या ट्रकमध्ये झोपायला गेला होता; मात्र वसीमचा मित्र मो. राजीक मो. साबीर ऊर्फ 'बादल' याचा काटा काढण्यासाठी आरोपी शेख रफिक शेख लतीफ याने शिवणी येथे राहणारा लहान भाऊ अब्दुल अजीज अब्दुल लतीफ याला बोलावून घेतले होते. बादलची हत्या करण्यासाठी केवळ वसीमचा वापर करण्याचे ठरले होते; मात्र यासाठी वसीमने नकार दिला. त्यामुळे वसीम खुनाच्या कटाची इतरांना माहिती देईल, या भीतीने त्याचाच खून करण्यात आला.

विशेष म्हणजे बादल, वसीम व रफीक या त्रिकुटात कुठेतरी अनैतिक संबंध आड येत असल्याने बादलची हत्या करण्याचा अनेकदा डाव रचल्या गेल्याची चर्चा आहे; परंतु घटनेच्या दिवशी आरोपींनी बादलवर दिवसभर पाळत ठेवली; परंतु योग्यवेळी आरोपींच्या नजरेतून बादल निसटला. त्यामुळे आरोपींनी वसीमची त्याच्या ट्रकपासून काही अंतरावरच गळ्याला दुप्पटा आवळून व दगडाने ठेचून हत्या केली.

'रेवा' श्वानाने दिलेल्या संकेतावरून पोलिसांनी शेख रफिक शेख लतीफ याचा शोध सुरू केला असतानाच तो गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग सोनोरी दरम्यान त्याच्या मोबाइलचे लोकेशन आले होते. समोर बोरगाव पोलिसांनी नाकेबंदी केल्याने तो म्हैसांग मार्गाने अकोल्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी रफिकचा लहान भाऊ अब्दुल अजीज अब्दुल लतीफ हा फरार झाला आहे.

उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, शहर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उप-निरीक्षक आशिष शिंदे, दीपक इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, उप-निरीक्षक सागर हटवार, पोहेकाँ गणेश पांडे, सुभाष अवचार, पोकॉं शक्ती कांबळे, संदीप काटकर, ओम देशमुख, चालक पोहेकॉं संजय निखाडे, शैलेंद्र ठाकरे व गणेश सोनोने आदींनी या गुन्ह्याचा छडा लावला.(शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी