शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात दिरंगाई; सुधीर कन्स्ट्रक्शन्सला १.८५ कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 13:54 IST

१० फेब्रुवारीपर्यंत १०० दिवसांच्या विलंबापोटी कंत्राटदाराला १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेगाव-पंढरपूर पालखी रस्त्याच्या कामात प्रचंड दिरंगाई केल्याचा कारणाने कंत्राटदार मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. नागपूर यांना विलंबासाठी प्रति दिवस १ लाख ८५ हजार रुपये दंड भरण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला. त्यानुसार १० फेब्रुवारीपर्यंत १०० दिवसांच्या विलंबापोटी कंत्राटदाराला १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, याच कंत्राटदाराकडे असलेली जिल्ह्यातील आणखीही दोन रस्त्यांची कामे संथ गतीने होत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंढरपूर-शेगाव रस्त्याच्या दुपदरीकरणासोबत दोन्ही बाजंूना पादचारी मार्ग तयार केला जात आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील ८२ किमीचे काम निविदेतून नागपूर येथील मे. सुधीर कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्पेस प्रा.लि. यांना मिळाले. ५ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यारंभ आदेशानुसार २४ महिन्यांत ते पूर्ण करण्याची मुदत आहे. काम पूर्णत्वाच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये २५.६२ टक्क्यांऐवजी १८ टक्केच पूर्ण झाले. त्यातच कंत्राटदार कंपनीने सप्टेंबर २०१९ पासून कामही जवळपास बंदच ठेवले. त्यामुळे या रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत. त्याचा दुचाकीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातूनच अपघाताची संख्याही वाढल्याची ओरड होत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदार सुधीर कन्स्ट्रक्शन यांना नोटीस देत दुसऱ्या माइलस्टोनपर्यंतच्या कामाला विलंब होत आहे. त्यासाठी २ नोव्हेंबर २०१९ या दिवसापासून विलंबासाठी दंडात्मक कारवाई सुरू केली.१० फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रत्येक दिवसासाठी १ लाख ८५ हजार ५०० रुपयेप्रमाणे हा दंड लावण्यात आला. करारनाम्यानुसार शंभर दिवसांच्या कालावधीसाठी १ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. कंत्राटदार कंपनीने काम थंडबस्त्यात ठेवल्याने ४ फेब्रुवारी २०२१ पर्यंतच्या मुदतीत पूर्ण होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पालखी मार्गानुसार अकोला-वाशिम-बुलडाणा जिल्ह्यांतील रस्त्याचा समावेश असलेल्या शेगाव-नागझरी-पारस-निमकर्दा-गायगाव-अकोला-गोरेगाव-वाडेगाव-डव्हा-रिसोड-लोणी-बीबी किनगावजट्टू यादरम्यान ३७१ कोटी रुपये खर्चातून हे काम केले जात आहे.

टॅग्स :Akolaअकोलाhighwayमहामार्ग