लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हॉटेलमधील काम आटोपून घरी परत जाणार्या दोघांपैकी एकावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा रामदास पेठ येथे घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिल बाळकृष्ण बोरसे (२३, रा. जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळ, स्वराज पेठ) हे त्यांचे मित्र अनिल गजानन अवमन यांच्यासोबत हॉटेलमधील काम पूर्ण करून घरी परत जात होते. गृहरक्षक दलाच्या क्रीडांगणाजवळ त्यांच्या मागून दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी श्रीकांत काळे यास ओळखतो काय, असे विचारले. त्यांनी नाही म्हटल्यावर अनिल बोरसे यांना या तिघांनी मारण्यास सुरुवात केली. परंतु, ते दोघेही तिथून पळून जवळच असलेल्या रुग्णालयाच्या आत जीव वाचविण्यासाठी शिरले. परंतु, ते तिघे रुग्णालयाच्या आत आले आणि अनिल बोरसे यांना धारदार शस्त्राने मारण्यास सुरुवात केली. त्यांनी आरडाओरड केली असता ते तिघेही पळून गेले. त्यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोल्यातील गृहरक्षक दलाच्या क्रीडांगणाजवळ युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:39 IST
हॉटेलमधील काम आटोपून घरी परत जाणार्या दोघांपैकी एकावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा रामदास पेठ येथे घडली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोल्यातील गृहरक्षक दलाच्या क्रीडांगणाजवळ युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला
ठळक मुद्देहॉटेलमधील काम आटोपून घरी परत जात असताना झाला हल्लाया प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे