शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

'शकुंतले'चा वनवास संपण्याची आशा; मध्य रेल्वेचे डीआरएम सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 20:32 IST

Shakuntala's exile hopes to end : मध्य रेल्वेचे प्रादेशिक उप व्यवस्थापक एस.एस.केडिया यांना येथील रेल्वे स्थानकावरील लोको शेड माध्ये आज निवेदन देण्यात आले,

मूर्तिजापूर : 'शकुंतला बचाव सत्याग्रहा'चे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक विजय विल्हेकर यांनी रणशींग फुंकल्यामुळे क्लीक निक्सन या ब्रिटीश कंपनीच्या गूलामगिरीतून नुकत्याच मुक्त झालेल्या 'शकुंतला' या रेल्वेचा अद्यापही न संपलेला 'वनवास' संपविण्याच्या सत्याग्रहातील दुसऱ्या टप्यात आज मध्य रेल्वेचे प्रादेशिक उप व्यवस्थापक एस.एस.केडिया यांना येथील रेल्वे स्थानकावरील लोको शेड माध्ये आज निवेदन देण्यात आले, आपल्यास्तरावर प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले व 'शकुंतले'चा वनवास संपण्याची अपेक्षा बळावली.          अचलपूर-यवतमाळ दरम्यान धावणारी नॕरोगेज रेल्वे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही क्लीक निक्सन या ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात होती. ही ब्रीटीश कंपनी आणि भारत सरकार दरम्यानचा करार संपुष्टात आल्यामुळे शकुंतला ब्रिटीशांच्या गूलामगिरीतून नुकतीच मुक्त झाली, मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालांमुळे सध्या ती बंद आहे व 'शकुंतले'चा वनवास अद्याप कायमच आहे.            या लोहमार्गावरील पूल, रस्ते सुस्थितीत आहेत त्यामुळे अत्यल्प खर्चात हा ऐतिहासिक वारसा जतन होऊ शकतो. ही मोलाची बाब विचारात घेऊन शासनदरबारी कैफीयत मांडण्याचा निर्धार विजय विल्हेकरांनी केला. त्यासाठीच्या सत्याग्रहाच्या पहिल्या टप्प्यात विजय विल्हेकरांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने येथील स्थानक व्यवस्थापक सवाई यांना 'अचलपूर-यवतमाळ नॕरोगेज रेल्वे' आहे त्या स्थितीत युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते.         आज डीआरएम केडिया येथील रेल्वे स्थानकाच्या नियमीत तपासणीसाठी आले असतांना या मागणीचे निवेदन थेट त्यांना देण्यात आले. त्यांच्या समवेत विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वातील शकुंतला बचाव सत्याग्रहींनी चर्चा केली. सुदाम काका देशमुख या तत्कालिन खासदारांना या रेल्वे संदर्भात वारंवार विनवण्या करणाऱ्या शकुंतलाताई देशमुख (ज्यांच्या पाठपुराव्यामुळे या रेल्वे गाडीचे 'शकुंतला' नामकरण झाले) यांचे सुपुत्र माधव देशमुख, मूर्तिजापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे, प्रा.सुधाकर गौरखेडे, पत्रकार अविनाश बेलाडकर, विलास नसले, अजय प्रभे, माधवराव काळे, संजय भारसाकळे, प्रविण कासारकर, सेवकराम लहाने, अरूण बोंडे या चर्चेत सहभागी झाले. डीआरएम केडिया यांनी 'या कामासाठी ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे, तो उपलब्ध करवून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, मी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करतो', असे आश्वासन दिले. मध्य रेल्वे चे वाणीज्य व्यवस्थापक बी.अरूणकुमार व अन्य अधिकारी त्यांच्या समवेत होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरIndian Railwayभारतीय रेल्वे