शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ब्रिटिशकालीन शकुंतला पुन्हा धावणार; रेल्वेमंत्र्यांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:03 IST

Shankutala Train of Murtijapur रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शकुंतला लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देखासदार नवनीत राणा यांनी शकुंतला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. पीयूष गोयल यांनी शकुंतला लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : बंद पडलेल्या शकुंतलेला कोणी वाली नसून, जनप्रतिनिधी उदासीन असल्याचे वृत ‘लोकमत’ने १७ सप्टेंबर रोजी प्रकाशित कले होते. ते वृत समाजमाध्यमांमध्ये जोरदार व्हायरल झाल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्याची दखल घेऊन शकुंतला पुन्हा सुरू करण्याची मागणी २२ सप्टेंबर रोजी संसदेत केली. त्यावर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शकुंतला लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.मेळघाटमधून अकोला-अकोट-धुळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई-खंडवा जाणारा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परावर्तित करू नका व विदर्भातील श्रमजीवी - कष्टकरी, शेतकरी यांची जीवनवाहिनी असणारी शकुंतला रेल्वे कायम बंद करू नका, सद्यस्थितीत बंद असलेली शकुंतला लवकरात लवकर चालू करा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी २२ सप्टेंबर रोजी लोकसभेत केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असली तरी मेळघाट शकुंतलेला रेल्वे इतिहासातून गायब होऊ देणार नसल्याचे सांगत शकुंतला रेल्वे पुनर्जीवित करणार असून, ती लवकरात लवकर चालू करणार करणार असल्याचे अभिवचन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिले असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. लोकसभेत खासदार नवनीत रवी राणा मेळघाट रेल्वे प्रश्नांवर आक्रमक झाल्या. पश्चिम विदर्भाची आन बान शान असणारी ब्रिटिश शकुंतला बंद झाल्याने मूर्तिजापूर-अचलपूर, मूर्तिजापूर यवतमाळ या मार्गावरील अनेक गावांतील लोकांना आता दळणवळण करताना कष्ट सहन करावे लागत आहे व त्यामुळे या भागातील व्यापार-उद्योग मंदावला असल्याने ही रेल्वे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी केली.शकुंतला सुरू झाल्याने वरील मार्गावरील अनेक गावांना लाभ होणार आहे. म्हणून शकुंतला रेल्वे सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले. त्याचबरोबर ब्रिटिशकालीन असणारी अकोला-अकोट-धुळघाट रेल्वे-डाबका-खंडवा मार्गावर धावणारी रेल्वे ब्रॉडगेज करण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली; परंतु आता सदर रेल्वेचा मार्ग परावर्तित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले, ज्यामुळे आदिवासींवर अन्याय होऊन ते मुख्य धारेतून बाहेर फेकल्या जाऊ शकतात व विकासापासून वंचित राहू शकतात.म्हणून हा मार्ग कुठल्याच परिस्थितीत बदलू नये व तातडीने ब्रॉडगेज करून या मार्गावरून रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असली तरी सदर मार्ग बदलणार नाही व ही रेल्वे जुन्याच मार्गाने धावेल व शकुंतला एक्स्प्रेससुद्धा लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे उत्तर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार नवनीत रवी राणा यांच्या प्रश्नावर दिले.

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलnavneet kaur ranaनवनीत कौर राणा