शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेवरून महापालिकेत सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:05 IST

सुमारे ४० कर्मचाºयांना रक्कम अदा केली असली तरी अनेक पात्र कर्मचाºयांना यादीतून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला: सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम अदा करण्याच्या मुद्यावरून महापालिकेत सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दुर्धर आजारी असलेल्या सुमारे ४० कर्मचाºयांना रक्कम अदा केली असली तरी अनेक पात्र कर्मचाºयांना यादीतून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाने गठित केलेल्या १८ सदस्यीय समितीचे कामकाज वादाच्या भोवºयात सापडले आहे.महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाºयांना प्रशासनाने पाचव्या वेतन आयोगाची रक्कम अदा केल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्याची मागणी कर्मचाºयांनी लावून धरली होती. सहाव्या वेतन आयोगापोटी महापालिका प्रशासनाला किमान ४० ते ४५ कोटी रुपये अदा करावे लागतील. उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, टॅक्सच्या थकबाकीचा आकडा पाहता सहाव्या वेतनाची रक्कम अदा करण्यावरून मनपासमोर पेच निर्माण झाला होता. अशा स्थितीत गंभीर आजार, शस्त्रक्रिया, पाल्याचा शैक्षणिक खर्च व मुला-मुलीचे लग्न कार्य असल्यास संबंधित कर्मचाºयाला किमान अर्धी रक्कम अदा करण्याची मागणी समोर आली. त्यावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत धोरण आखले. अशा कर्मचाºयांनी सादर केलेले प्रस्ताव योग्य आहेत किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या स्तरावर अधिकारी व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मिळून १८ सदस्यीय समितीचे गठन केले. यामध्ये कर्मचाºयांनी सादर केलेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, लेखा विभागातील अधिकारी यांच्यासह पारदर्शीपणा ठेवण्याकरिता कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांचा समावेश करण्यात आला. मागील तीन महिन्यांपासून या समितीकडे कर्मचाºयांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रस्ताव मंजूर करण्याच्या मुद्यावरून कर्मचारी संघटनांमध्ये आपसात प्रचंड बेबनाव निर्माण झाला. अखेर कर्मचाºयांचे हित समोर ठेवून समितीने दुर्धर आजारी कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा केली.पात्र कर्मचाºयांवर अन्याय?समितीने तयार केलेल्या ४० कर्मचाºयांच्या यादीतून अनेक पात्र कर्मचाºयांचे प्रस्ताव बेदखल करून नव्याने मर्जीतल्या कर्मचाºयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाने गठित केलेल्या समितीचा कारभार वादाच्या भोवºयात सापडला आहे. त्यामुळे यापुढे दुसरी यादी तयार करताना पात्र कर्मचाºयांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी समोर आली आहे.

२६ लाखांचा धनादेश परत घेतला!दोन महिन्यांपूर्वी समितीने ४० कर्मचाऱ्यांना थकीत रकम अदा करण्यापोटी २६ लाख रुपयांचा धनादेश तयार केला होता; परंतु मर्जीतल्या कर्मचाºयांचा यादीत समावेश न केल्याच्या मुद्यावरून कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आपसात चांगलेच बिनसले. वाद वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने २६ लाखांचा धनादेश परत घेतला होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका