शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास सात वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:22 IST

अकोला:  बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर २०१५ मध्ये तोंड दाबून बलात्कार करणाऱ्या नराधमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

अकोला:  बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय चिमुकलीवर २०१५ मध्ये तोंड दाबून बलात्कार करणाऱ्या नराधमास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. संतोष गौतम बरडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी एक वर्षांच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक ९ वर्षीय चिमुकली २ फेब्रुवारी २०१५ रोजी घराजवळील एका धार्मिक स्थळाजवळ मैत्रींनीसोबत खेळत होती. तीला सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान लघुशंका आल्याने धार्मिक स्थळामागे असलेल्या एका झाडाजवळ गेली असता अंधाराचा फायदा घेत आरोपी संतोष गौतम बरडे याने तीला उचलून अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर या चिमुकलीचे तोंड दाबून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. काही वेळातच सदर घटना गावात वाºयासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थानी पिंजर पोलिस स्टेशन गाठून गुन्हेगार संतोष गौतम बरडे याच्याविररुध्द तक्रार दिली. पिंजर पोलिसांनी त्याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपास पुर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले तसेच सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेश आकोटकर यांनी भक्कमपुरावे सादर करीत बाजू मांडल्याने न्यायालयाने आरोपी संतोष बरडे याला कलम ३७६ अन्वये सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंडातील ४ हजार रुपयांची रक्कम पिडीत चिमुकलीस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहीले. तर तपास शिरभाते यांनी केला होता.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयRapeबलात्कार