शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातपुते हत्याकांडातील दोन आरोपींना सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:35 IST

अकोला: जुने शहरामध्ये घडलेल्या सातपुते हत्याकांड प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली असून, न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली.

अकोला: जुने शहरामध्ये घडलेल्या सातपुते हत्याकांड प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली असून, न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. २५ आॅक्टोबर २०१५ रोजी कैलास पांडुरंग सातपुते यांची कुºहाडीने हल्ला करून हत्या करण्यात आली होती.शिवसेना वसाहतीमधील रहिवासी कैलास पांडुरंग सातपुते आणि रवींद्र ऊर्फ विक्की जनार्दन माळी यांच्यामध्ये पूर्ववैमनस्यावरून वाद सुरू होते. याच दरम्यान २५ आॅक्टोबर २०१५ च्या रात्री दीड वाजता रवींद्र ऊर्फ विक्की जनार्दन माळी आणि विठ्ठल सुभाष काळे या दोघांनी सातपुते यांच्या घरात प्रवेश करून कैलास आणि त्याचे वडील पांडुरंग उकर्डा सातपुते यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. गंभीर जखमींना या परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान कैलास सातपुते यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी रवींद्र ऊर्फ विक्की जनार्दन माळी आणि विठ्ठल सुभाष काळे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ३०४, ३०२, ४४९, ३४२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात दोन आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात पाठविले होते. या प्रकरणाची सुनावणी द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. जाधव यांच्या न्यायालयात झाल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने १० साक्षीदार तपासले. त्यानंतर न्यायालयाला आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अन्वये सात वर्षांची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे. तर कलम ४५२ अन्वये ५ वर्षांची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड आणि कलम ३२३ अन्वये ६ महिने शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय