शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:00 IST

राष्ट्रपाल राजाराम वानखडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरगट परिसरातून जात असलेल्या दोघांवर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील चार हजार ८०० रुपये पळविणाºया आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवीत सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. राष्ट्रपाल राजाराम वानखडे असे आरोपीचे नाव असून त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.खदान परिसरातील रहिवासी देवानंद लक्ष्मन गवई व त्यांचे मामा गौतम कंकाळ हे दोघे जन २६ एप्रिल २०१० रोजी मरगट रोडने जात असतांना महात्मा फुले नगरातील रहिवासी राष्ट्रपाल राजाराम वानखडे याने सदर दोघांना अडवून दारु पिण्यासाठी पैसे मागीतले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता वानखडे याने त्याच्या कमरेत लावलेला चाकू काढून तो देवानंद गवई यांच्या पोटात खुपसला, त्यानंतर गौतम कंकाळ यांनाही बेदम मारहाण केली. हे दोघेही जखमी झाल्यानंतर आरोपी राष्ट्रपाल वानखडे याने दोघांच्या खीशातील चार हजार ८०० रुपयांची रोकड घेउन पळ काढला. जखमी दोघांनी तातडीने खदान पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार त्यांना सांगीतला. त्यानंतर खदान पोलिसांनी राष्ट्रपाल राजाराम वानखडे याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ तसेच ३९४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय पी. व्ही. लांडे यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात सादर केले. न्यायालयाने ९ साक्षीदार तपासल्यानंतर साक्ष पुराव्यावरुन आरोपी राष्ट्रपाल राजाराम वानखडे याला दोषी ठरवीले. त्यानंतर कलम ३०७ अन्वये सात वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३९४ अन्वये सात वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी