शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी आरोपीस सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:52 IST

वाशिम: अल्पवयीन बालिकेवरील बलात्कारप्रकरणी दोषी आढळून आलेल्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील बाळू गणेश बोरकर या २५ वर्षीय आरोपीस ७ वर्षीय सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.के. गौर यांनी मंगळवार १0 ऑक्टोबर रोजी सुनावली.

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल गणेशपूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अल्पवयीन बालिकेवरील बलात्कारप्रकरणी दोषी आढळून आलेल्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील बाळू गणेश बोरकर या २५ वर्षीय आरोपीस ७ वर्षीय सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.के. गौर यांनी मंगळवार १0 ऑक्टोबर रोजी सुनावली.रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथे १४ मार्च २0१६ रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास सदर घटना घडली होती. आरोपी बाळू बोरकर याने तालुक्यातीलच एका खेडेगावातून पीडित बालिकेस घरातून बोलावून गणेशपूर येथे आपल्या घरी पळवून आणले होते. या घटनेबाबत पीडित बालिकेच्या भावाने दुसर्‍या दिवशी सकाळी रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. रिसोड पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करून बाळू गणेश बोरकर याची आई सुमनबाई गणेश बोरकर व सीताराम श्रावण गवई रा. लोणी फाटा, रिसोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने एकूण १५ साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यावरून आरोपी बाळू बोरकर हा दोषी आढळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गौर यांनी आरोपीस भादंविचे कलम ३७६ तसेच कलम ३ व ४ बालसंरक्षण कायद्यामध्ये सात वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा  तसेच कलम ३६३ भादंविमध्ये तीन महिने सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली. सदर दोन्ही शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. सबळ पुराव्याअभावी आरोपी सुमनबाई बोरकर व सीताराम गवई या दोघांना न्यायालयाने निर्दोष सोडले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता पी.एस. ढोबळे यांनी बाजू मांडली.