शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सात वर्षीय आदिवासी मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:39 IST

अकोट : हिवरखेड मार्गावरील एका हॉटेलात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सात वर्षीय आदिवासी मुलाची हत्या करण्यात आली. सदर घटना ५ डिसेंबर रोजी घडली.

ठळक मुद्देकृष्णा गणेश जांभेकर हा आदिवासी मुलगा हिवरखेड मार्गावरील फिजा हॉटेलवर राहत होता. फिरोज खान अकबर खान, सलीम खान अकबर खान दोघेही रा. इंदिरा नगर अकोट यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अकोट ग्रामीण रुग्णालय व तेथून अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अकोट : हिवरखेड मार्गावरील एका हॉटेलात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सात वर्षीय आदिवासी मुलाची हत्या करण्यात आली. सदर घटना ५ डिसेंबर रोजी घडली. मारहाण केलेल्या अवस्थेत त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती केले असता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पोलीस तपासात मारहाणीमागील गंभीर बाब समोर येण्याची शक्यता पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीत मध्य प्रदेशातील नेफा नगर येथील मूळचा रहिवासी कृष्णा गणेश जांभेकर हा आदिवासी मुलगा हिवरखेड मार्गावरील फिजा हॉटेलवर राहत होता. या ठिकाणी आरोपी फिरोज खान अकबर खान, सलीम खान अकबर खान दोघेही रा. इंदिरा नगर अकोट यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गंभीर अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालय व तेथून अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावर चटके दिल्याचे आढळून आले. सदर मुलाचा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर अकोट ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून उपरोक्त आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई अकोट शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे करीत आहेत. या कारवाईत ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर व शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह नारायण वाडेकर, सुनील फोकमारे, गजानन भगत, प्रवीण गवळी, अनिल सिरसाट, नंदू कुलट, राजेश कोहरे, राजेश जौंधारकर, रामेश्वर भगत यांनी आरोपी पळून जाण्याआधीच शिताफीने अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)फोटो आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCrime Newsगुन्हेगारी