शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

संच मान्यतेमध्ये विद्यार्थी आधारसह नोंदविण्याची मुदत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:07 IST

पुढील वर्षीच्या संच मान्यतेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार कार्ड क्रमांकासह नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे शिक्षकांची विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास एकच धावपळ उडाली; परंतु आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविली असल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्देशिक्षकांना दिलासा२३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी पोर्टलवर भरावी लागणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पुढील वर्षीच्या संच मान्यतेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार कार्ड क्रमांकासह नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे शिक्षकांची विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास एकच धावपळ उडाली; परंतु आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविली असल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. गत काही दिवसांपासून संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड क्रमांकासह माहिती भरण्याचे काम शिक्षक करीत होते. माहिती भरताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थी पोर्टल हे संकेतस्थळ अनेकदा बंद पडत होते किंवा संथपणे काम करीत असल्याने शिक्षकांना दिवसभरात विद्यार्थ्यांची माहिती भरताना त्रास होत होता. शेकडो शिक्षक मध्यरात्रीच्या सुमारास कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन माहिती भरण्याचे काम करीत होते आणि शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीचा कालावधीसुद्धा कमी असल्यामुळे शिक्षकांनी संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास पुरेसा कालावधी देण्याची मागणी केली होती. संच मान्यतेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार कार्डसह माहिती न भरल्यास शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ येत असल्याने जिल्हय़ातील शाळांमधील शिक्षक चांगलेच कामाला लागले. शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड नसल्यामुळे शिक्षकांनाच त्यांचे आधार कार्ड काढून देण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड क्रमांकासह माहिती न भरल्यास शाळा, वर्गामधील पटसंख्या कमी दिसून येते आणि शिक्षकांना अतिरिक्त ठरावे लागते. ही वेळ आपल्यावर येऊ नये, यादृष्टीने शिक्षकच विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांना येणार्‍या अडचणी लक्षात घेता, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यास २३ ऑक्टोबरपर्यंंत मुदत वाढविल्यामुळे शिक्षकांना आता पुरेसा वेळ मिळणार आहे. 

शिक्षकांना शाळांमधील विद्यार्थ्यांंची माहिती भरण्यासाठी १६ ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती; परंतु हजारो विद्यार्थ्यांंची माहिती संच मान्यतेमध्ये भरल्या गेली नव्हती. त्यासाठी शिक्षकांनीसुद्धा मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदत २३ ऑक्टोबरपर्यंंत करण्यात आली आहे. यानंतर मुदत वाढविली जाणार नाही. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड