शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाउन: खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 12:53 IST

खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वीज पुरवठा खंडित होत असल्याने, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक कार्यालयाच्या दस्त नोंदणीचे सर्व्हर डाउन झाले असल्याने, ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी गत दोन दिवसांपासून स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत असून, शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक कार्यालयाचा वीज पुरवठा सोमवार, १३ जानेवारीपासून खंडित होत आहे. मंगळवारीही या कार्यालयाचा वीज पुरवठा दिवसभर खंडित होता. त्यामुळे सहजिल्हा निबंधक कार्यालयाचे दस्त नोंदणीचे ‘आय-सरिता’ सर्व्हर डाउन झाले असून, ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी या कार्यालयात होणारे घर, प्लॉट, जमीन इत्यादी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार गत दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत.त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सहजिल्हा निबंधक कार्यालयात ताटकळत बसावे लागत असून, नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.यासोबतच खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने, मुद्रांक शुल्क व दस्त नोंदणीपोटी शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूलही प्रभावित झाला आहे.त्यानुषंगाने सहजिल्हा निबंधक कार्यालयाचा वीज पुरवठा, ‘नेट कनेक्टिव्हिटी’ केव्हा सुरळीत होणार आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार केव्हा पूर्ववत होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ५० लाखांचा महसूल प्रभावित!सहजिल्हा निबंधक कार्यालयात प्रत्येक दिवशी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे सरासरी ४५ ते ५० व्यवहार होतात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कापोटी २० ते २५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो; मात्र गत दोन दिवसांपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने, दोन दिवसांत सहजिल्हा निबंधक कार्यालयाला मिळणारा ५० लाख रुपयांचा महसूल प्रभावित झाला आहे.

वीज पुरवठा खंडित होत असल्याने, दस्त नोंदणीचे सर्व्हर डाउन झाले आहे. ‘नेट कनेक्टिव्हिटी’ नसल्याने गत दोन दिवसांपासून स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. ‘नेट कनेक्टिव्हिटी’ समस्या निवारणाचा प्रयत्न सुरू असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत होतील.-डी. एस. भोसले,सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोला