लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : मळसूर-आलेगाव रस्त्यावर २३ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कार्ला येथील विकास शांताराम सोनोने हा सोमवारी दुपारी २ वाजता त्याची वहिनी शीतल नितेश सोनोने हिला एम.एच.३0 ए.यू. ९६७२ क्रमांकाच्या मोटारसायकलने तिचे माहेर असलेल्या गावंडगाव येथे घेऊन जात असताना चरणसिंग चव्हाण यांच्या शेताजवळ मोटारसायकल रस्त्यावरून घसरून अपघात झाला. या अपघातात विकासच्या हातापायाला व तोंडाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याची वहिनी शीतल सोनोने हिच्या हाताला किरकोळ जखम झाली. गंभीर जखमी असलेल्या विकास सोनोने याला प्रथम आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. फैजल यांनी प्रथम उपचार करून जखमीला अकोला येथे सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून, उपचार सुरू असल्याचे समजते.
मोटारसायकल अपघातात एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 19:18 IST
आलेगाव : मळसूर-आलेगाव रस्त्यावर २३ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता मोटारसायकलचा अपघात होऊन कार्ला येथील एक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोटारसायकल अपघातात एक गंभीर जखमी
ठळक मुद्देमळसूर-आलेगाव मार्गावरील घटनाजखमीला अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविले