अकाेट-अकाेला राेडवर एम एच ३० एएम ४४६८ क्रमांकाच्या दुचाकीने दाेघे अकाेटकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली़ दाेघेही गंभीर जखमी अवस्थेत राेडवर पडून असताना त्यांना कुणीही मदत केली नाही़ यावेळी रस्त्यावरून अकाेटकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक समीर ढेंबरे आणि वाहनचालक मोहम्मद अतहर तपासणीकरिता अकोटकडे जात असताना त्यांना या अपघाताची माहिती मिळाली़ त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने वाहन परत घेऊन जखमींना त्यांच्या वाहनात घेतले़ त्यांनतर अकाेट फैल पाेलिसांना याची माहिती दिली़ अकाेट फैल पाेलिसांनी दाेन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या दुचाकीचालकांना धडक देणाऱ्या वाहनाचा शाेध अकाेट फैल पाेलिसांनी सुरू केला असून त्यांच्याविरुध्द अकाेट फैल पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती़
अकाेट राेडवर भीषण अपघातात दाेघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST