शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना पुन्हा मिळणार कोविड लसीचा बूस्टर! आरोग्य यंत्रणेला ‘इन्कोव्हॅक’ लस प्राप्त, नाकावाटे घ्यावी लागणार

By प्रवीण खेते | Updated: April 29, 2023 16:56 IST

ही लस नाकावाटे घ्यावी लागणार असून, अकोल्यातील ज्येष्ठांनादेखील ही लस घेता येणार आहे.

अकोला : कोविडचा संभाव्य धोका पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुन्हा लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील ज्येष्ठांना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ही लस नाकावाटे घ्यावी लागणार असून, अकोल्यातील ज्येष्ठांनादेखील ही लस घेता येणार आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यातील इतर भागात कोविड वाढताना दिसून येत आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता म्हणून पुन्हा लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मात्र, यंदा नाकावाटे दिली जाणारी ‘इनोव्हॅक’ लस उपयोगात आणली जाणार आहे. प्रिकॉशन म्हणून ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. यासंदर्भात १८ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत राज्य शासनामार्फत कोविड १९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीची खरेदी करून जिल्हा व महापालिका आरोग्य यंत्रणेला वितरित करण्याची सूचना दिली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी ‘इन्कोव्हॅक’ लसीचा साठा प्राप्त झाला असून, लवकरच जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्याला मिळाले ५०० डोस -महापालिका क्षेत्रासाठी - २०० डोसग्रामीण क्षेत्रासाठी - ३०० डोस

मंगळवारपासून मोहीम सुरू होण्याची शक्यता -आराेग्य यंत्रणेला प्राप्त झालेला ‘इन्कोव्हॅक’ लसीचा साठा लसीकरण केंद्रांना वितरित करण्यात आला आहे. मात्र, सलग तीन दिवस सुट्टी आल्याने ही मोहीम मंगळवार, २ मेपासून सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागात तालुकास्तरावरच लसीकरणलसीचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार आहे. ग्रामीण भागात केवळ तालुकास्तरावरच ही मोहीम राहणार असून, लाभार्थींना ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

नाकावाटे घेतली जाणारी ‘इन्कोव्हॅक’ लस ही सध्या ज्येष्ठ नागरिकांनाच दिली जाणार आहे. जिल्ह्यासाठी लसीचा साठा उपलब्ध झाला असून, लसीकरण केंद्रांना तो वितरित करण्यात आला आहे. लवकरच लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून, ज्येष्ठांनी ही लस घ्यावी.- डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या