शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठी वरिष्ठ, निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:31 IST

अकोला: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण राबविण्याचा निर्णय २१ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

अकोला: राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण राबविण्याचा निर्णय २१ डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रशिक्षणाचा शिक्षकांना सेवेमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून लाभ होणार आहे. हे प्रशिक्षण जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षकांना देण्यात येणार आहे.राज्यातील शंभर टक्के मुले शिकण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या शिक्षण विभागामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद, न.प., मनपा, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयांमधील पूर्णवेळ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्यावतीने प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षकांना भाषा-मूलभूत क्षमता वाचन, गणित संबोध विकासन, तेजस प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षकांना अविरत-१, सीएचईएसएस, आयआयटीचे गणित प्रशिक्षण, न्यासचे विज्ञान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २0१७-१८ पर्यंत ज्या शिक्षकांनी सेवांतर्गत प्रशिक्षण घेतले आहे आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यंदा बारा वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीसाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण, २४ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवडश्रेणीसाठी प्रत्येक वर्षी दहा दिवसांचे प्रशिक्षण याप्रमाणे चार वर्षांत ४0 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

सलग चार वर्षांत ४0 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणाºया शिक्षकांना बारा वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षांनंतर निवडश्रेणी मिळते. हे प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर सुधारतेच, सोबतच शिक्षकांनासुद्धा आर्थिक लाभ मिळतो; परंतु त्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. आॅनलाइन अर्ज करून पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिल्या जाते.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक