शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपात नियुक्त होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:33 IST

अकोला: महापालिकेत नियुक्त होण्यासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांची नकारघंटा कायम असल्यामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. शासनाकडे वारंवार शिफारस पत्र सादर केल्यावरही शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे.

अकोला:महापालिकेत नियुक्त होण्यासाठी शासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांची नकारघंटा कायम असल्यामुळे प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत असून, प्रशासकीय कामकाजाचा ताण एकट्या आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यावर येत असल्याचे चित्र आहे. मनपाची बिकट परिस्थिती पाहता पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असता, प्रशासनाने इत्थंभूत अहवाल सादर केल्याची माहिती आहे.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असणाºया भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मनपातील वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. त्याचा गैरफायदा विकासात्मक कामांचा कंत्राट मिळवलेल्या कंत्राटदारांकडून घेतला जात आहे. आजरोजी मनपातील दोन्ही उपायुक्त पदे मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहेत. मुख्य लेखा परीक्षक, शहर अभियंता आदी पदे रिक्त आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे वारंवार शिफारस पत्र सादर केल्यावरही शासन सकारात्मक निर्णय घेत नसल्याचे दिसून येत आहे. उपायुक्त पदांसाठी काही वरिष्ठ अधिकाºयांनी नकार दिल्याचे बोलल्या जात आहे. एकूणच चित्र पाहता भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांनी शासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मागील आठ महिन्यांपासून वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा सर्व भार आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यावर येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी प्रशासकीय समस्या व इतर मुद्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.शहर अभियंता खान यांची बदलीमहापालिकेचे शहर अभियंता इक्बाल खान यांची अमरावती जिल्ह्यात येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या विभागीय कार्यकारी अभियंता पदावर बदली झाली आहे. त्यांचे पद रिक्त झाल्यामुळे जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे शहर अभियंता पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.मनपात दोन उपायुक्तांची पदे, मुख्य लेखा परीक्षक , शहर अभियंता आदींसह नगररचना विभागातील पदे रिक्त आहेत. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पालकमंत्र्यांकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे.-जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील