शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार  रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक होणार ‘सेवाव्रती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:57 IST

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागातील कर्मचारी तसेच इतर नागरिक अशी ४० लोकांची फळी या सामाजिक कामासाठी तयार झाली आहे.या सेवाव्रतींसाठी सर्वोपचारमध्ये एक दालन निश्चित करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात हे सेवाव्रती प्रत्यक्ष कार्यरत होतील, अशी ग्वाही दिली.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून हे ज्येष्ठ नागरिक ‘सेवाव्रती’ होऊन रुग्णांच्या सहकार्यासाठी तत्पर राहणार असून, त्यांच्यासाठी रुग्णालय परिसरात सोमवारी दालन निश्चित करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळावा घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता या चर्चेमधून सर्वोपचारमध्ये येणाºया रुग्णांना होणाºया त्रासाबाबत अनेकांच्या तक्रारी असल्याचे समोर आले. या तक्रारींमध्ये रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली. याची नोंद घेत पालकमंत्री डॉ. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांनीच या कामी पुढाकार घेतला, तर शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये असलेले सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच इतर नागरिक अशी ४० लोकांची फळी या सामाजिक कामासाठी तयार झाली आहे. या सेवाव्रतींसाठी सर्वोपचारमध्ये एक दालन निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांनी सोमवारीच सर्वोपचारमध्ये भेट देऊन हे दालन निश्चित केले. येत्या काही दिवसात हे सेवाव्रती प्रत्यक्ष कार्यरत होतील, अशी ग्वाही दिली. अशी असेल सेवासर्वोपचारमध्ये येणारे रुग्ण, त्यांची तपासणी कुठे होणार, औषध कुठे मिळेल, रक्त किंवा इतर तपासण्यांबाबतची माहिती हे ज्येष्ठ नागरिक सेवाव्रती या दालनातून देणार आहेत. एखाद्या रुग्णाला थेट मदत करण्यापासून तर त्याच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यापर्यंत हे सेवाव्रती काम करणार आहेत.पंतप्रधानांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याच्या कार्याप्रती नतमस्तक होत सर्वोपचार मध्ये ‘सेवाव्रती’ हा उपक्रम सुरू करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार व प्रत्यक्ष सहभाग यामुळे रुग्णांना निश्चितच मदत होईल.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील