बळीराम वानखडे /खामगाव : भाजप-सेनेच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांसह १४ जणांना अकोला व बुलडाणा जिल्हय़ातून २ वर्षांंसाठी तडीपार करण्यात यावे, अशा प्रकारचा प्रस्ताव पोलीस विभागामार्फत उपविभागीय महसूल अधिकार्यांकडे दाखल करण्यात आला. यानंतर एसडीओ बाबासाहेब वाघमोडे यांनी या सर्वांंना तडीपारीच्या नोटिसा पाठवून प्रकरण सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव, शेगाव शहर व तालुक्यातील एकूण १४ लोकांविरोधात अकोला व बुलडाणा या दोन जिल्हय़ातून तडीपार करण्यासंदर्भात पोलिसांनी प्रकरण उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे पाठविले होते. त्यानंतर सदर प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे पड ताळणीसाठी वर्ग करण्यात आले होते. चौकशीअंती या १४ जणांवर तडीपारी प्रकरण सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर एसडीओ वाघमोडे यांनी प्रकरण सुरू केले आहे. तडीपारीच प्रस्ताव असणार्यांमध्ये खामगाव शहरातील ओमप्रकाश शर्मा, राहुल कळमकार, पप्पू तोडकर या भाजपा-सेना पदाधिकार्यांचा समावेश आहे. खामगाव शहरात कोणतीही निवडणूक असो, आंदोलन असो, यात भाजप-सेनेच्या या कार्यकर्त्यांंचा सहभाग असतो; मात्र त्यांनाच तडीपारी नोटीस बजावण्यात आली. नोटीस देण्यात आलेल्यांमध्ये राहुल पुंजाजी कळमकार व योगेश पुंजाजी कळमकार रा. दाळफैल खामगाव, ओमप्रकाश नारायणदास शर्मा रा. अभय नगर, पप्पू ऊर्फ ओंकारआप्पा तोडकर गोकुल नगर खामगाव यांच्यासह रवींद्र सापुर्डा बांगर रा. पारखेड, योगेश किशोर भुसारी शिवनेरी चौक शेगाव, मो. वसीम अब्दुल कादर इकबाल चौक शेगाव, पंकज कैलास लिप्ते देशमुख पुरा शेगाव, योगेश महादेव तायडे सरकारी फैल शेगाव, विनोदसिंग ऊर्फ पिंटू ईश्वरसिंग राजपूत जलंब, रवी वसंतराव राऊत इंदिरा नगर सुटाळा बु., देवराव भाऊराव हिवराळे चितोडा, अनंता वसंता पांढरे लाखनवाडा बु. यांचा समावेश आहे.
भाजप-सेना कार्यकर्त्यांवर संक्रांत
By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST