शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 10:25 IST

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, मंगळवारी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, मंगळवारी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले.नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कोरोना कालावधीत काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षा विमा कवच लागू करण्यात यावे, निनावी तक्रारीसंदर्भात कार्यवाही करण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवार, २८ जुलै रोजी एक दिवसीय लेखणीबंद आंदोलन केले. प्रलंबित मागण्यांचे निवेदन अधिकारी व कर्मचाºयांच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप भोसले यांना सादर करण्यात आले. यावेळी सह दुय्यम निबंधक एन.जी. एम्बडवार, बी.के. मेश्राम, एस.पी. चव्हाण, डी. बी. देशपांडे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, जिल्ह्यात मंगळवारी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराचे कामकाज ठप्प झाले होते.नोंदणी-मुद्रांक शुल्कापोटी ७० लाखांचा बुडाला महसूल!नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी लेखणी बंद आंदोलन केल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री व्यवहारातून जिल्ह्यात दर दिवशी शासनाच्या तिजोरीत जमा होणारा ६० ते ७० लाख रुपयांचा महसूल मंगळवारी बुडाल्याचा अंदाज आहे.

नागरिकांना नाहक हेलपाटे!जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खरेदी-विक्री व्यवहाराचे कामकाज बंद राहिल्याने मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारासाठी आलेल्या नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग