अकोला, दि. २९- घर खाली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आत्मदहन करण्याची धमकी देणार्या युवकास पोलिसांनी बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून उशिरा सायंकाळी त्याला सोडण्यात आले. प्रशांत चौधरी नामक युवकाने त्याचे घर एका भाडेकरूला ११ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर दिले. दरम्यान, त्याने भाडेकरूला घर खाली करून देण्यासाठी तगादा लावला; परंतु भाडेकरू घर खाली करीत नसल्याने त्याने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आणि २९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. बुधवारी दुपारी प्रशांत चौधरी हा आत्मदहन करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला; परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून उशिरा सायंकाळी पोलिसांनी त्याला सोडून दिले.
आत्मदहनाची धमकी देणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 02:59 IST