शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

स्वबळाची तयारी: जिल्हा परिषदसाठी भाजपाचे मिशन ‘३५ प्लस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:20 IST

जि.प. व पंचायत समिती मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी पूर्णवेळ जबाबदारी निश्चित केली जाणार असून, जिल्हा परिषदेत ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे.सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाची रणनीती कशी राहील, याची चाचपणी सुरू झाली आहे.महापालिका निवडणूक एकहाती जिंकून भाजपाने इतिहास घडविला असल्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याचा चंग पक्षाने बांधला आहे.

-  राजेश शेगोकारअकोला : भाजपा-शिवसेनेची केंद्र व राज्यात युती असली तरी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. अकोल्यात तर या दोन पक्षांमध्ये फारसे सख्य नाहीच, त्यामुळे नगरपालिका, महापालिका स्वबळावर जिंकणाºया भाजपाने आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर बुथप्रमुख, शक्तीप्रमुख अशा रचनेसोबतच प्रत्येक जि.प. व पंचायत समिती मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी पूर्णवेळ जबाबदारी निश्चित केली जाणार असून, जिल्हा परिषदेत ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची माहिती आहे.अकोला जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी आयोगाने ग्रामीण लोकसंख्येची माहिती मागवली आहे. २०११ मध्ये केंद्र शासनाने केलेल्या जनगणनेतील लोकसंख्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामध्येच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींची लोकसंख्याही निश्चित झालेली आहे. दरम्यानच्या काळात अकोला महापालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे त्या भागाची लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येतून बाद झाली आहे. आता होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सद्यस्थितीत असलेल्या ५३ मतदारसंघाच्या संख्येत पाचने घट होऊ शकते. त्यामुळे होणाºया ४८ ऐवजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात किमान ५० सदस्य संख्या ठेवण्यासाठी मतदारसंघाची रचना करताना कमी लोकसंख्येचा समावेश करून तेवढी संख्या निश्चित होण्याचीही शक्यता आहे. या सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाची रणनीती कशी राहील, याची चाचपणी सुरू झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून भाजपाला जिल्हा परिषद ताब्यात घेता आली नाही. महापालिका निवडणूक एकहाती जिंकून भाजपाने इतिहास घडविला असल्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती तयार झाली असून, प्रत्येक सर्कलनिहाय जबाबदारी निश्चित करण्यासाठी बैठक होत आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम

अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या आधी होऊ घातली आहे. त्यामुळे ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे भाजपासाठी लोकसभेचे तोडीस तोड उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी तसेच खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे रणशिंग फुंकणाऱ्या भाजपासाठी जिल्हा परिषद निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBJPभाजपा