शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यात केवळ १४ टक्केच शाळांचे स्वयंमूल्यमापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:47 IST

अकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनासाठी शाळासिद्धी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे स्वयंमूल्यमापनासाठी ३0 जानेवारी अंतिम मुदत दिली आहे; परंतु राज्यात केवळ १४ टक्के शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे. मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्याप ८६ टक्के म्हणजेच राज्यातील ९३ हजार ४३९ शाळांनी स्वयंमूल्यमापन केलेले नाही.शाळासिद्धी कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर राज्यातील सर्व शाळांची माहिती भरून शाळा स्वयंमूल्यमापन करण्याचे निर्देश विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. १00 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन जानेवारी २0१९ अखेर पूर्ण करण्यास सांगितले होते. यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागानेसुद्धा शाळांना सूचना दिल्या होत्या; परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील १ लाख ९ हजार ११0 शाळांपैकी केवळ १५ हजार ६७१ शाळांनीच स्वयंमूल्यमापन केले आहे. अद्याप ९३ हजार ४३९ शाळांनी स्वयंमूल्यमापन केलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात केवळ ९.१३ टक्के, अमरावती जिल्ह्यात ५.५४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १0.३४ टक्के, वाशिम-१९.१६ टक्के, यवतमाळ-८.४७ टक्केच शाळांनी स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. स्वयंमूल्यमापन करण्यात शाळा उदासीनता दाखवित असल्यामुळे या शाळांसाठी पुन्हा मुदत वाढविण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा